ग्लोबल

आशियात 20 हजार वर्षांपूर्वीच येऊन गेलाय कोरोना; DNA त मिळाले अवशेष

विनायक होगाडे

नवी दिल्ली : सध्या जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसबद्दल एक नवी माहिती पुढे आली आहे. कोरोना व्हायरसने याआधी 20 हजार वर्षांपेक्षाही अधिक काळापूर्वी आशियामध्ये थैमान माजवल्याची ही सनसनाटी माहिती एका अभ्यासामधून पुढे आली आहे. चीन, जपान आणि व्हिएतनामच्या लोकांच्या डीएनएमध्ये यासंदर्भातले अवशेष या अभ्यासादरम्यान मिळाले आहेत.

'करंट बायोलॉजी'मध्ये प्रकाशित संशोधनामध्ये हा दावा केला आहे. या प्रदेशांमधील आधुनिक लोकसंख्येच्या 42 जनुकांमध्ये कोरोना व्हायरसच्या कुटूंबाचे अनुवांशिक अनुकूलतेचे पुरावे सापडले आहेत. कोरोना व्हायरसमुळे झालेल्या संसर्गामुळे आतापर्यंत जगभरातील 38 लाखाहून अधिक लोकांचा जीव गेला आहे. तसेच अब्जावधी डॉलर्सचं नुकसान झालं आहे. कोरोना व्हायरसच्या परिवारामध्ये मार्स आणि सार्स व्हायरस देखील सामील आहेत, ज्यामुळे गेल्या 20 वर्षांमध्ये अनेक घातक संक्रमणे मानवावर चाल करुन आली आहेत.

सोईल्मी आणि टॉबलरचा शोध

ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीच्या यासिन सौइल्मी आणि रे टोबलर त्यांच्या संशोधनावर आधारे म्हणाले की, ऐतिहासिक परिणाम संक्रमणाच्या उद्रेकांच्या अनुवंशिक अवशेषांचा शोध घेणे आपल्याला भविष्यातील उद्रेकांवर उपचार करण्यास कशी मदत करू शकतील याचा आम्ही शोध घेत आहोत.

मानवी इतिहासात तीन संक्रमणांनी घातलाय धूमाकूळ

सोईल्मी आणि रे टॉबलर यांचं म्हणणं आहे की, जागतिक महासाथी या मानवी इतिहासा इतक्याच जुन्या आहेत. आपण मानव प्राणी म्हणून याआधी देखील जागतिक महासाथींचा सामना केला आहे. 20 व्या शतकात, इन्फ्लूएंजा व्हायरसच्या तीन प्रकारांनी धूमाकळू घातला होता. यामध्ये 1918-20 मध्ये स्पॅनिश फ्लू, 1957-58 चा एशियन फ्लू आणि 1968-69 चा हाँगकाँग फ्लूने हाहाकार माजवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

SCROLL FOR NEXT