London Sakal
ग्लोबल

ब्रिटनच्या ‘अनलॉक’वर टांगती तलवार; कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली

ब्रिटनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या हळूहळू वाढत चालली आहे. रविवारी चोवीस तासात ५३४१ जणांना बाधा झाली असून चौघांचा मृत्यू झाला.

पीटीआय

लंडन - ब्रिटनमध्ये (Britain) कोरोनाबाधितांची (Corona Patients) संख्या हळूहळू वाढत (Increase) चालली आहे. रविवारी चोवीस तासात ५३४१ जणांना बाधा झाली असून चौघांचा मृत्यू (Death) झाला. यामागे डेल्टा व्हेरियंट (Delta Variant) असल्याचे सांगितले जात असून याच व्हेरियंटने भारतात (India) हाहा:कार माजवला होता. दरम्यान, इस्त्राईलमध्ये मुलांचे लसीकरण सुरू झाला आहे. (Corona Patients Increase in Britain)

ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट हॅनॉक यांनी देशात डेल्टा व्हेरियंट हा चाळीस टक्क्यांपेक्षा अधिक वेगाने पसरत असल्याची भीती व्यक्त केली आहे. परिस्थिती अशीच कायम राहिल्यास २१ जूनपासून लागू होणाऱ्या अनलॉकचा निर्णय आणखी काही दिवसांसाठी लांबणीवर टाकावे लागेल. अनलॉकचा निर्णय पुढे ढकलावा की आणखी नव्याने काही निर्बंध जोडावे लागतील, याबाबत बैठकीत चर्चा केली जाईल, असे त्यांनी नमूद केले. ब्रिटनमध्ये १७ मे पासून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे.

त्यानंतर आठवड्याला ४० टक्क्याने रुग्णांत वाढ होत गेली. याशिवाय स्वीडनमध्ये आठवड्याला १६ टक्के, पोर्तुगालमध्ये १६ टक्के, लक्झेमबर्गमध्ये २४ टक्के, आइसलँडमध्ये ४० टक्के, रशियात ५ टक्के आणि आयर्लंडमध्ये ३ टक्क्यांपर्यंत वाढ होत गेली आहे. दुसरीकडे फ्रान्स, ग्रीस, इटली, जर्मनी आणि स्पेनमध्ये स्थितीत सुधारणा झाली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत या देशांची बिकट अवस्था झाली होती. अनलॉकनंतर फ्रान्समध्ये १७ टक्के, स्पेनमध्ये ९ टक्के, इटलीत ३१ टक्के, ग्रीसमध्ये २२ टक्के तर जर्मनीत २७ टक्क्यांपर्यंत रुग्णसंख्येत घसरण अनुभवास आली.

हर्ड इम्युनिटीनंतर मुलांचे लसीकरण

इस्त्राईलने ‘हर्ड इम्युनिटी’ मिळवल्यानंतर आता १२ ते १६ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. यासाठी अमेरिकी लस फायजरला आपत्कालिन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. या ठिकाणी एकूण लोकसंख्येच्या ५५ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. व्यवहार सुरू झाले असले तरी बंदिस्त हॉलमध्ये एकत्र येणाऱ्या नागरिकांना मास्कची अनिवार्यता ठेवली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT