Corona Update  sakal
ग्लोबल

Corona Update : भीती पसरण्यास चीनचे धोरण कारणीभूत

विश्‍लेषकांचा अंदाज; अनेक देशांमध्ये कोरोना चाचणी सक्तीची

सकाळ वृत्तसेवा

बीजिंग : चीनमध्ये कोरोना संसर्गाचा पुन्हा उद्रेक झाला असला तरी त्या विषाणूचा प्रभाव अद्याप इतरत्र दिसून आलेला नाही. तरीही, अनेक देशांनी चीनमधून येणाऱ्या नागरिकांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे.

माहिती उघड न करण्याच्या चीनच्या धोरणामुळे संसर्गाचे गांभीर्य समजायच्या आत तो सर्वत्र पसरेल, अशी शक्यता या देशांना वाटत असल्यानेच त्यांनी ही उपाययोजना केली असल्याचे विश्‍लेषकांनी सांगितले.

चीनमध्ये वेगाने रुग्णसंख्या वाढत असून या देशातून आलेल्या काही नागरिकांना संसर्ग झाला असल्याचेही विमानतळांवर घेतलेल्या कोरोना चाचण्यांमधून स्पष्ट झाले आहे. मात्र, त्या संसर्गाची लाट इतर कोणत्याही देशात अद्यापपर्यंत पसरलेली नाही.

मात्र, कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी चीनने त्याची माहिती वेळीच जगासमोर न आणल्याने या संसर्गाने विक्राळ रुप धारण केले होते. तीच भीती आताही वाटत असल्याने अनेक देशांनी चीनमधून येणाऱ्या नागरिकांना कोरोना चाचणी सक्तीची केली आहे.

कोरोना चाचणी निगेटिव्ह असेल तरच चीनमधून येणाऱ्या नागरिकांना प्रवेश देण्याचा निर्णय अमेरिकेने आज घेतला आहे. भारत, जपान, तैवान, ऑस्ट्रेलिया आणि इतरही अनेक देशांनी उपाययोजना केली आहे. चीनमधील संसर्गाच्या स्थितीबाबत ठोस माहिती मिळत नसल्याने ही परिस्थिती ओढवली असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

चीनमध्ये रुग्णालये भरली

चेंगडू : कोरोना संसर्गग्रस्तांची संख्या वाढत असल्याने चीनमधील रुग्णालये भरली आहेत. अनेक ठिकाणी रुग्णालयांबाहेर रुग्ण थांबून रहात असल्याचे सूत्रांनी सांगितले. कोरोना नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करणाऱ्या चीनने अचानक अनेक नियम शिथिल केल्यानेच ही परिस्थिती ओढवली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पुढील वर्षी अनेक निर्बंध रद्द केली जाणार असल्याने संसर्ग वेगाने पसरण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे यांच्या पराभवाची ५ कारणं; दोघांचं भांडण, महेश सावंतांचा लाभ

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: एकनाथ शिंदेंनी शब्द खरा करून दाखवला, विधानसभेतील 'ते' भाषण व्हायरल

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: माळशिरसात सातपुते २०७५ मतांनी पिछाडीवर

महायुती २०० पार, तर मविआची अनेक जागांवर हार, जाणून घ्या सर्व पक्षांच्या 'स्ट्राइक रेट'चा अहवाल

SCROLL FOR NEXT