न्यूयॉर्क : कोरोना व्हायरस कधीच संपण्याची शक्यता नाही असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून काल (ता. १३) पत्रकार परिषद घेण्यात आली, त्यामध्ये कोरोना व्हायरसची साथ कधी आटोक्यात येणार? हा विषाणू कधी संपणार? या प्रश्नावर जागतिक आरोग्य संघटनेकडून कदाचित हा विषाणू कधीच संपणार नाही, असा धोक्याचा इशारा दिला आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
यावेळी बोलताना डब्ल्यूएचओच्या इमर्जन्सी विभागाचे संचालक डॉ. माईक रेयान म्हणाले, "कोरोना विषाणूवर लस विकसित झाली तरीदेखील विषाणूला आळा घालण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतील. साथीचे आजार पसरवणाऱ्या इतर अनेक विषाणूंप्रमाणे हादेखील एक विषाणू असेल आणि तो आपल्या समाजातून कधीच संपणार नाही. एचआयव्ही विषाणूही हद्दपार झालेला नाही. मात्र, त्याला कसं हाताळायचं, हे आता आपण शिकलो आहोत.
Coronavirus : अमेरिकेत 'ट्रम्प डेथ क्लॉक'ची चर्चा; काय आहे प्रकरण?
रेयान पुढे म्हणाले, 'जगभरात १०० हून जास्त लसींवर संशोधन सुरू आहे. मात्र, आपल्याला माहिती आहे की गोवरसारखे अनेक आजार आहेत ज्यावर लस उपलब्ध आहेत. मात्र, तरीही या आजारांचं समूळ उच्चाटन झालेलं नाही. तर या विषाणूवर प्रयत्नपूर्वक नियंत्रण मिळवणं अजूनही शक्य असल्याचा आशावाद जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. घेब्रेयेसूस यांनी व्यक्त केला आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दरम्यान, डॉ. रेयान यांच्या मते, 'असाही चमत्कारिक मतप्रवाह दिसून येतो आहे की लॉकडाऊनचा चांगला परिणाम दिसून आला आहे आणि त्यामुळे लॉकडाऊन उठवणं योग्य ठरेल. मात्र, यात धोके आहेतच. जनजीवन सामान्य होण्यासाठी अजून बराच वेळ लागणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.