coronavirus taiwan precautions information marathi 
ग्लोबल

चीनचा शेजारी असूनही तैवान कोरोनापासून वाचला कसा?

रफिक पठाण

Fight With Coronavirus: चीनच्या वुहान आणि हुबेई प्रांतांतून सुरू झालेला कोरोना व्हायरसचा संसर्ग आता संपूर्ण जगात पोहोचला आहे. चीननंतर आता अमेरिका, इटली, स्पेन आणि इराणमध्ये सर्वाधिक मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत, परंतु चीनला लागून असलेल्या तैवानने असे काय केले. ज्यामुळे तेथे कोरोना विषाणूला रौद्ररूप धारण करण्यापासून रोखता आले आहे असा एक मोठा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.  चीन सोबतच जगातील मृत्यू आणि संक्रमणाची संख्या सातत्याने वाढत असताना, डोएशवेल यांच्या अहवालानुसार तैवानमध्ये यावर पूर्णतः नियत्रण मिळवता आले आहे.  कोरोन विषाणूच्या नियंत्रणासाठी सैन्याला फवारणी करण्यासाठी पाचारण करण्यात आले व प्रत्येकाला शाळांमध्ये मास्क घालायला सांगण्यात आले होते. आतापर्यंत उर्वरित जगात कोरोना संसर्गाची लाखो प्रकरणे नोंदविली गेली आहेत, परंतु चीनला लागून असूनही, तैवानमध्ये कोरोनाचे केवळ ३५५ प्रकरणे समोर आली आहेत, त्यातील ५० व्यक्ती पूर्णपणे बरे झाले असून केवळ ५ लोकांचा कोरोनामुळे तैवानमध्ये मृत्यू झाला आहे. चीनचे शेजारी राष्ट्र असूनही तैवानने हे काय कार्य कसे केले हे जगातील प्रत्येक देश जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. 

शास्त्रज्ञांना ठरवले खोटे
कोरोना विषाणूचा संसर्ग चीनमध्ये जानेवारीमध्ये सुरू झाला, त्याच वेळी तज्ञांना असे वाटत होते की, चीनला लागून असलेली सर्व शहरे यांत बळी पडतील आणि तेथील मृतांचा आकडा लक्षणीय असेल.  चीननंतर कोरोनाचे कित्येक प्रकरणे केवळ तैवानमध्येच पाहिली जातील असे तज्ञांचे मत असताना चीनमध्ये जेथे ८१ हजारांहून अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत, तेथे तैवानमध्ये केवळ ३५५ प्रकरणांवर हे थांबवले आहे.  आता आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की तैवानने विषाणूपासून बचाव करण्यासाठी त्वरित पाऊल उचलले. 

राष्ट्रीय आरोग्य कमांड सेंटर 
अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे डॉक्टर जेसन वांग म्हणतात की तैवानने या प्रकरणातील गांभीर्य फार लवकर ओळखले. २००२ आणि २००३  मध्ये तैवानने सार्स साथीच्या नंतर नॅशनल हेल्थ कमांड सेंटरची स्थापना केली होती. तैवानला हे लवकर समजले की कोरोना पुढील महामारी ठरू शकेल, हे लक्षात घेऊन तिथे अगोदरच तयारी करण्यात आली होती. 

प्रवासावर बंदी
चीनमध्ये कोरोना बळी पडण्याचे प्रकार वाढू लागताच तैवानने आपल्या नागरिकांना चीन, हाँगकाँग आणि मकाऊ येथे जाण्यास बंदी घातली. इतकेच नव्हे तर तैवान सरकारने सर्जिकल मास्कच्या निर्यातीवरही बंदी घातली जेणेकरून देशात कमी होऊ नये. परिणामी, तिथे मास्क कमी पडले नाहीत व परिस्थिती खराब झाली नाही.  सरकारने आपली संसाधने अतिशय विचारपूर्वक वापरली. तैवानच्या सरकारने राष्ट्रीय आरोग्य विमा, इमिग्रेशन आणि कस्टममधील डेटा गोळा केला आणि लोकांच्या प्रवासाचा इतिहास वैद्यकीय अधिकाऱ्यांशी जोडला आणि कोणाला संसर्ग होऊ शकतो हे शोधले आणि त्यानंतर त्यानुसार उपाययोजना केल्या असे वांग यांनी सांगितले. 

कोरोनासाठी ऍप
तैवान सरकारनेसुद्धा अशी काही ऍप्स  विकसित केली आहेत ज्याद्वारे लोक देशात प्रवेश करताना क्यूआर कोड स्कॅन करू शकतात आणि त्यांच्या लक्षणे आणि त्यांच्या प्रवासाविषयी माहिती देऊ शकतात. यानंतर या लोकांच्या फोनवर मेसेज पाठविला जाईल, जो ते सीमाशुल्क अधिकार्यांना दाखवतील. कोणास आत जाण्याची परवानगी देण्यात आली व कोणाची देखरेख करावी हे आता अधिकारी ओळखू शकतील. वांग म्हणतात की नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तैवानचे सरकार बरेच काही करू शकले. सरकारने आपले काम केवळ प्रामाणिकपणानेच केले नाही तर तैवानच्या लोकांनीही त्यांच्या सरकारला पाठिंबा दर्शविला.  लोकांनी त्यांना दिलेल्या सूचनांचे पालन केले.   सार्स दरम्यान लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते, त्या गोष्टी त्यांच्या मनात ताज्या झाल्या, यामुळे लोकांमध्ये सामाजिक एकताची भावना निर्माण झाली. त्यांना समजले की या कठीण काळात ते सर्व एकत्र आहेत आणि म्हणूनच सरकार सांगेल त्यावर विश्वास ठेवणे योग्य आहे. असे केल्याने कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यास तैवानमध्ये मदत झाली. 

बायोमेडिकल संशोधनात गुंतवणूक 
तैवानने गेल्या काही दशकांमध्ये बायोमेडिकल संशोधनात बरीच गुंतवणूक केली आहे.  कोरोनाच्या बाबतीत, सरकारने लवकरच विषाणूची चाचणी घेण्यासाठी केंद्रे सुरू केली. आता तिथली टीम अशा कसोटीवर काम करत आहे, ज्याद्वारे चाचणी घेतलेल्या व्यक्तीला कोरोना आहे की नाही हे अवघ्या २० मिनिटांत कळेल. तैवान सरकारचा लोकांना घरीबसल्या कोरोना संसर्ग आहे की नाही हे तपासता यावे असे कीट बनवण्याचा हेतू आहे. हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की तैवान हा जागतिक आरोग्य संघटने(WHO)चा भाग नाही. तरीसुद्धा तैवान सध्या जगभरातील देशांसाठी कोरोनाचा संसर्ग थांबवता येईल याचे आदर्श उदाहरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : मविआचा विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव का झाला? शरद पवार यांनी सांगितली 'ही' कारणं

Latest Maharashtra News Updates : विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर शरद पवारांची पत्रकार परिषद

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: ऋषभ पंत, श्रेयस अय्यर इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू! जाणून घ्या पहिल्या सत्रात कोणाला लागल्या बोली

Daund Assembly Election 2024 Result : दौंड विधानसभा निवडणुकीत एकाच कुटुंबात विजयाच्या दोन हॅटट्रीक; कुल पिता-पुत्रांसाठी जनादेश

Junior National Kho Kho Championship स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर; भरतसिंग वसावे आणि सुहानी धोत्रे कर्णधार

SCROLL FOR NEXT