Israel File Photo
ग्लोबल

इस्त्रायल झाला मास्क फ्री; ठरला जगातील पहिला देश

इस्त्रायलमधून एक आनंदाची बातमी समजत आहे. आता सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याची आवश्यकता नसल्याची मोठी घोषणी इस्त्रायसाच्या आरोग्य विभागाने केली आहे.

कार्तिक पुजारी

जैरुसलम- जगात कोरोना महामारीचे थैमान सुरुच आहे. 2020 मध्ये अख्या जगाला वेठीस धरलेल्या कोरोना महामारीने 2021 मध्येही आपला प्रकोप सुरुच ठेवला आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी किंवा तिसरी लाट आली आहे. त्यामुळे लोकांना वारंवार हाथ धुणे, मास्कचा वापर करणे अशा कोरोना नियमांचे पालन करावे लागत आहे. आणखी किती काळ या महामारीच्या भीतीखाली राहावं लागेल असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यातच आता इस्त्रायलमधून एक आनंदाची बातमी समजत आहे. आता सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याची आवश्यकता नसल्याची मोठी घोषणी इस्त्रायसाच्या आरोग्य विभागाने केली आहे.

कोरोनाचा हाहाकार केव्हा संपेल आणि आपल्याला पूर्वीसारखं आयुष्य कधी जगता येईल याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. पण, इस्त्रायलच्या नागरिकांनी कोरोनापूर्वीसारखीचे आयुष्य जगणे सुरु केले आहे. इस्त्रायलमधील एकूण लोकसंख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. त्यामुळे देशात कोरोना संसर्ग पुन्हा पसरण्याचा धोका कमी झाला आहे. यापार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने लोकांवरील सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याची सक्ती काढून टाकली आहे. त्यामुळे नागरिकांना आता सार्वजनिक ठिकाणी मास्कशिवाय फिरण्यात मुफा मिळाली आहे.

एकेकाळी इस्त्रायलमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला होता. त्यानंतर देशात लसीकरण मोहीत हाती घेण्यात आली. बघताबघता देशात अर्ध्यापेक्षा अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. जगाच्या तुलनेत इस्त्रायलमधील लसीकरण मोहिमेची अती खूप अधिक होती. इस्त्रायलमध्ये जानेवारीच्या सुरुवातीला दिवसाला 10 हजार कोरोना रुग्ण आढळून येत होते. पण, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून आता दिवसाला 200 रुग्ण आढळून येत आहेत.

इस्त्रायलमधील शाळा, हॉटेल, रेस्टराँ, बार सुरु करण्यात आले आहेत. मास्क घालण्याची सक्ती नसली, तरी अनेक लोक मास्क न घालण्याचा धोका पत्करायला तयार नाहीत. मास्क हा अनेकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाला आहे. इस्त्रायलमध्ये आतापर्यंत 836,000 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर 6,300 लोकांचा विषाणूने बळी घेतला आहे. आतापर्यंत देशातील 53 टक्के म्हणजे 93 लाख लोकांना कोरोना प्रतिबंध लस देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कणकवली मतदारसंघात पहिल्‍या फेरीत भाजपचे नितेश राणे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT