Crown Prince of Saudi sent a team of 50 special people to Pakistan esakal
ग्लोबल

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

Sandip Kapde

पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. देश चालवण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नाही. शाहबाज शरीफ दुसऱ्यांदा देशाचे वझीर-ए-आझम झाले पण देशाची स्थिती जैसे थेच आहे. दरम्यान सौदी अरेबिया पाकिस्तानच्या मदतीला धावून आला आहे. सौदीच्या क्राउन प्रिन्सने ५० खास लोकांची टीम पाकिस्तानला पाठवली. शाहबाज सरकारच्या सहकार्याने कोणतं मिशन तयार केले जात आहे?, असा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण केल्या जात होता.

सौदी अरेबिया पाकिस्तानवर दया दाखवत आहे. गुंतवणुकीची क्षमता पाहून सौदीला पाकिस्तानात मोठा गुंतवणूक करायची आहे. सौदी शिष्टमंडळाच्या या भेटीपासून पाकिस्तानला पूर्ण आशा आहेत. सौदी येथे गुंतवणूक करेल असे त्याला वाटते.

सौदी अरेबियाने पाकिस्तानात पाठवलेली ५० लोकांची टिम तेथील व्यापार आणि गुंतवणुकीच्या शक्यता तपासणार आहे. नंतर याचा अहवाल क्राउन प्रिन्सला देण्यात येणार आहे. सौदी अरेबियाचे उप गुंतवणूक मंत्री इब्राहिम अलमुबारक हे पाकिस्तानमध्ये गेलेल्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत.

पाकिस्तानचे वाणिज्य मंत्री जाम कमाल खान आणि पेट्रोलियम मंत्री मुसादिक मसूद मलिक यांनी सौदी शिष्टमंडळाचे स्वागत केले. ५० सदस्यीय शिष्टमंडळात ३० कंपन्यांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. ५० सदस्यांचे हे शिष्टमंडळ रविवारी इस्लामाबादला पोहोचले. दोन्ही देशांमधील गुंतवणूक परिषद आजपासून (सोमवार) सुरू होणार आहे. यामध्ये दोन्ही देशातील कंपन्यांचे अधिकारी सहभागी होणार आहेत. दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देणे हा गुंतवणूक परिषदेचा उद्देश आहे.

सौदी अरेबियाचे उप गुंतवणूक मंत्री इब्राहिम अलमुबारक यांनी सांगितले, शिष्टमंडळात सौदी कंपन्यांच्या विविध क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश आहे. यामध्ये माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार, ऊर्जा, विमान वाहतूक, बांधकाम, खाण उत्खनन, कृषी आणि मानव संसाधन विकास या क्षेत्रांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT