Russia Attack 
ग्लोबल

Russia church Attack: रशिया हादरलं! चर्चच्या फादरचा गळा कापला, 15 पोलिसांचा गोळीबारात मृत्यू, 5 हल्लेखोरांचा खात्मा

कार्तिक पुजारी

मॉस्को- रशियामध्ये डागेस्तान भागात एका सिनेगाँगवर ( सनातन चर्च) दहशतवादी हल्ला झाला आहे. पाच हल्लेखोरांनी चर्चेवर हल्ला केला. रशियन न्यूज एजेन्सीने दिलेल्या माहितीनुसार, पाचही हल्लेखोरांना मारण्यात यश आलं आहे, पण या प्रयत्नामध्ये १५ पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे. हल्ल्यामध्ये १२ पेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

रशियामध्ये हल्लेखोरांकडून विविध ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे. यात डर्बेंट आणि मखचकाला शहरीत चर्च, प्रार्थना स्थळे आणि पोलीस स्टेशनचा समावेश आहे. डर्बेंटमधील फादर निकोले यांची देखील दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली आहे. दहशतवाद्यांनी त्यांचा गळा कापला. याप्रकरणी ऑपरेशन लाँच करण्यात आले असून यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही अज्ञात हल्लेखोरांनी सिनेगाँगवर हल्ला केला होता. यासाठी त्यांनी ऑटोमॅटिक मशिन गनचा वापर केला होता.रविवारी सुट्टी असल्याने अनेकजण चर्चेमध्ये होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १९ लोकांनी चर्चेमध्ये आश्रय घेतला होता. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. हल्ल्यानंतर चर्चला आग लागली होती. एका पोलीस स्टेशनला देखील लक्ष्य करण्यात आले.

रशियातील दहशतवादी हल्ल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये काही बंदुकधारी लोक पोलिसांवर गोळीबार करत असल्याचं दिसत आहे. आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी कोणी घेतलेली नाही. मात्र, रशियन सरकारने याप्रकरणी म्हटलंय की, आम्हाला माहिती आहे हा हल्ला कोणी केला. त्यांचा हेतू काय होता हे देखील आम्हाला चांगलेच माहिती आहे.

सदर हल्ल्यामुळे रशिया हादरला आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या दोन वर्षांपासून युद्ध सुरू आहे. अद्याप या युद्धावर काही तोडगा निघालेला नाही. रशियाने शस्त्रसंधीची तयारी केली आहे, पण त्यासाठी युक्रेनला आपला बराचसा भूभाग गमवावा लागणार आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी होण्याची शक्यता सध्या तरी कमी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : ९८व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी तारा भवाळकर यांची निवड

IND vs PAK T20WC : what a ball…! पाकिस्तान संघाला पहिल्याच षटकात धक्का, Renuka Singh ने उडवला त्रिफळा, Video

Bigg Boss Marathi 5 grand finale LIVE updates - वोटिंग ट्रेंड्समध्ये निक्कीने सूरजला टाकलं मागे

गोफण | सुखाची झोप उडाली, वस्तादांचा मोठा गेम

Maharashtra Politics: मोदींचं मंदिर बांधलेला भक्त सावध झाला; भाजपला मात्र 'राम राम' ठोकला

SCROLL FOR NEXT