अंडरवर्ल्ड डॉन आणि भारतातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार दाऊद इब्राहिमवर विष प्रयोग झाल्याची बातमी काल (सोमवारी) सर्वत्र पसरली होती. यावरून अनेक अफवा सोशल मिडीयावर पसरल्या होत्या. पण दाऊदला काहीच झालं नाही, त्याची प्रकृती एकदम ठीक आहे, अशी माहिती त्यांचा राईट हँड छोटा शकील याने दिल्याची माहिती समोर आली आहे. (Marathi Tajya Batmya)
दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाला असून त्याची प्रकृती गंभीर असल्याच्या बातम्या काल समोर आल्या होत्या. दाऊदच्या प्रकृतीबाबत चर्चेला उधाण आले होते त्याचबरोबर पाकिस्तानातील इंटरनेट सेवा बंद पडल्याने चर्चेत भर पडली होती. पण हे वृत्त छोटा शकील याने फेटाळलं आहे. ‘दाऊद जिवंत आणि निरोगी आहे. ही फेक न्यूज पाहून मलाही धक्का बसला. काल मी त्याला अनेकदा भेटलो,’ असं शकीलने न्यूज18 या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे.(Latest Marathi News)
छोटा शकील याने दिलेल्या माहितीनंतर आता दाऊद जिवंत असल्याचं समोर आलं आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दाऊद इब्राहिमला गेल्या दोन दिवसांपासून कराचीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे रुग्णालयात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दाऊदला कोणीतरी विष दिल्याचा दावा केला जात होता. सोशल मीडियावर दाऊदबाबतच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, त्यानुसार विविध प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत.
खोटे स्क्रीनशॉट व्हायरल (Dawood Ibrahim Fact Check)
काही युजर्सनी पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर-उल-हक काकर यांनी X वर पोस्ट केल्याचे स्क्रीनशॉट देखील व्हायरल केले होते. मात्र, काकर यांच्या X account वर गेल्या 24 तासात एकही पोस्ट टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे हे स्क्रीनशॉट खोटे असल्याचे स्पष्ट झाले. (Marathi Tajya Batmya)
इंटरनेट सेवा बंद Internet Shut Down in Pakistan:
पाकिस्तानमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार रविवारी रात्री बऱ्याचशा शहरांमधील इंटरनेट डाऊन झाले. डाऊन डिटेक्टरवरील माहितीनुसार संध्याकाळी ७ नंतर कराची, लाहोर, रावळपिंडी येथील इंटरनेट डाऊन झाले. यामागे दाऊद इब्राहिम हे कारण असल्याची शक्यता भारतीय युजर्स वर्तवत होते. मात्र, पाकिस्तानात इंटरनेट डाऊन होण्यामागे राजकीय कारण असल्याचं सांगितलं गेलं.(Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.