चंडीगड : रशियाच्या लष्कराने युक्रेनविरुद्धच्या युद्धात लढण्यासाठी आघाडीवर पाठविलेल्या भारतीय युवकाचा मृत्यू झाल्याचा त्याच्या कुटुंबीयांनी केला. रवी मौन असे त्याचे नाव असून तो हरियानातील कैथाल जिल्ह्यातील मटौर या गावाचा रहिवासी आहे. रशियाची राजधानी मॉस्कोतील भारतीय दूतावासानेही रवीच्या मृत्यूची पुष्टी केल्याचा दावा त्याचा भाऊ अजय मौन याने केला.
त्याने सांगितले, की रवी यावर्षी १३ जानेवारी रोजी वाहतुकीसंदर्भातील नोकरीसाठी एका एजंटने रवीला रशियाला पाठविले होते. मात्र, तिथे त्याची रशियाच्या लष्करात भरती करण्यात आली. युक्रेनविरुद्धच्या युद्धात आघाडीवर न लढल्यास दहा वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची धमकी रवीला देण्यात आली होती. आम्ही १२ मार्चपर्यंत रवीच्या संपर्कात होतो. तो अतिशय निराश झाला होता, अशी माहितीही अजय मौनने दिली.
त्याच्या ठावठिकाण्याविषयी अजय मौनने २१ जुलैला मॉस्कोतील भारतीय दूतावासाला पत्र लिहून विचारणा केली होती. रवी मौनचा मृत्यू झाल्याची माहिती दूतावासाने दिल्याचे अजयने सांगितले. रशियाच्या अधिकाऱ्यांना रवीच्या मृत्यूची पुष्टी करण्याची व मृतदेह सुपूर्द करण्याची विनंती केल्याचे उत्तर भारतीय दूतावासाने दिले.
त्यानुसार, रशियाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या मृत्यूची पुष्टी केली. मात्र, जवळच्या नातेवाईकाच्या डीएनए चाचणीचा अहवालही मागितला आहे, असेही दूतावासाने स्पष्ट केले. दरम्यान, भावाचा मृतदेह भारतात परत आणावा, अशी विनंती अजय मौनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.
नोकरीसाठी विकली जमीन
रशियात नोकरी मिळत असल्याचे समजल्यावर रवी मौनच्या कुटुंबीयांनी हरियानातील एक एकर जमीन विकली. त्यातून आलेल्या ११.५० लाख रुपयांतून त्याला रशियाला पाठविले होते, अशी माहितीही अजय मौनने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.