Delta Airlines Undergarments Rules For Flight Attendants Esakal
ग्लोबल

Delta Airlines Undergarments Rule: अंतर्वस्त्र दिसू नयेत... एअरलाइन्सने जारी केल्या कपडे घालण्याबद्दलच्या गाइडलाईन्स, जगभर होतेय नियमांची चर्चा

आशुतोष मसगौंडे

अमेरिकेच्या डेल्टा एअरलाइन्सने नुकतेच अंतर्वस्त्रांबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. दरम्यान हा प्रकार समोर आल्यानंतर जगभरात याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

एअरलाइन्सने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सांगितले आहे की, जर एखादी व्यक्ती कंपनीमध्ये फ्लाइट अटेंडंट म्हणून प्रशिक्षण किंवा नोकरी शोधत असेल तर तिचा/त्याचा पोशाख विशिष्ट पद्धतीतच असावा.

या नियमामुळे विमान कंपनीला सोशल मीडियावर टीकेला सामोरे जावे लागत आहे.

एअरलाइन्सने नुकताच दोन पानांचा मेमो जारी केला. ज्यामध्ये हे नियम आणि अटी स्पष्ट केल्या आहेत. एअरलाइन्सने ते फ्लाइट अटेंडंटच्या मुलाखती, प्रशिक्षण आणि करिअरच्या प्रगतीसाठी जारी केले आहे.

या मार्गदर्शक तत्त्वात केस, ग्रूमिंग, दागिने आणि कपड्यांबाबत नियम करण्यात आले आहेत. ज्यामध्ये सर्वात खास नियम अंतर्वस्त्रांशी संबंधित आहे.

मार्गदर्शक तत्त्वांनुसार, योग्य अंतर्वस्त्रे आवश्यक आहेत, परंतु ते अदृश्य असले पाहिजेत. एअरलाइनने नवीन फ्लाइट अटेंडंटना या नियम व अटींचे पालन करण्यास सांगितले आहे.

आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे एअरलाइनचे म्हणणे आहे. त्यामुळे, फ्लाइट अटेंडंटने या नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.

कंपनीने नमूद केलेल्या नियमांमध्ये केसांचा नैसर्गिक रंगही समाविष्ट केला आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की केसांचा रंग कृत्रिम छटाशिवाय असावा.

मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आणखी काय?

  • लांब केस मागे ओढून खांद्याच्या वर ठेवावेत, जर ते मागील बाजूस सोडले असतील तर ते योग्यरित्या पिन केले पाहिजेत.

  • पापण्या नैसर्गिक दिसल्या पाहिजेत.

  • नखे निऑन रंग किंवा हाताने रंगलेली नसावीत.

  • टॅटू झाकणे आवश्यक आहे.

  • कर्मचाऱ्यांना फक्त एक नाक टोचण्याची परवानगी आहे. नाकाव्यतिरिक्त, शरीराचे इतर छिद्र दिसू नये.

  • कपडे आणि स्कर्ट गुडघ्यापर्यंत किंवा खाली असावेत.

  • ऍथलेटिक शूज घालण्याची परवानगी नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT