Deaths happen within 48 hours Esakal
ग्लोबल

कोरोनानंतर आणखी एका गूढ आजाराने डोकेदुखी वाढली! ही लक्षणे दिसली तर ४८ तासात रुग्णाचा मृत्यू निश्चित

Deaths happen within 48 hours: कोरोनानंतर आशियाई देश जपानमध्ये गूढ रोग पसरला आहे. या रोगाची लक्षणे दिसू लागल्यानंतर ४८ तासांत रुग्णाचा मृत्यू होत आहे. WHO आणि तज्ञ देखील या आजारामुळे खूप चिंतेत आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

कोरोनाने जगाची डोकेदुखी वाढवली होती, यामधून काहीसा दिलासा मिळताच आणखी एका गुढ रोगामुळे जगाची चिंता वाढली आहे. आजकाल पूर्व आशियाई देश जपानमध्ये दुर्मिळ आजाराने थैमान घातले आहे. हा आजार कोणाला झाला तर त्याचा मृत्यू निश्चित आहे. अवघ्या ४८ तासांत रुग्णाचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. हा गूढ आजार मांस खाणाऱ्या जिवाणूंमुळे पसरत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कोरोनावरील निर्बंध उठवल्यानंतर देश पुन्हा एकदा नव्या आजाराच्या विळख्यात सापडला आहे.

48 तासांच्या आत लोकांचा जीव घेणाऱ्या दुर्मिळ “मांस खाणाऱ्या बॅक्टेरिया”मुळे होणारा आजार जपानमध्ये पसरत आहे, असे ब्लूमबर्गने शनिवारी सांगितले.

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फेक्शियस डिसीजेसचे याबाबत माहिती देताना म्हटलं आहे की, ते 1999 पासून या रहस्यमय आजारावर लक्ष ठेवून आहेत. या वर्षी 2 जूनपर्यंत जपानमध्ये या आजाराच्या 977 रुग्णांची नोंद झाली आहे, तर गेल्या वर्षी त्याची नोंद 941 होती. यंदा या आजाराने अधिक कहर केला आहे. तज्ञांच्या मते, याला स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम (एसटीएसएस) असे नाव देण्यात आले आहे.

लक्षणे आणि कोणत्या वयोगटातील लोकांना जास्त धोका?

या रोगाची सुरुवात सहसा सूज आणि घसा खवखवण्यापासून होते. परंतु विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंमुळे लक्षणे वेगाने विकसित होऊ शकतात. ज्यामध्ये शरीराच्या अवयवांमध्ये वेदना आणि सूज, ताप, कमी रक्तदाब यांचा समावेश होतो. श्वास घेण्यात समस्या, अवयव निकामी होणे आणि नंतर मृत्यू. ५० वर्षांवरील लोकांमध्ये हा आजार पसरण्याचा धोका अधिक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

रोग झाला तर मृत्यूचा धोका

टोकियो वुमेन्स मेडिकल युनिव्हर्सिटीतील संसर्गजन्य रोगांचे प्राध्यापक केन किकुची म्हणतात, "या आजाराचा सर्वात मोठा धोका हा आहे की, 48 तासांच्या आत रूग्णाचा मृत्यू होऊ शकतो. रुग्णाच्या पायाला सूज येताच त्याचे गांभीर्य लक्षात येते. सकाळी, दुपारपर्यंत ते गुडघ्यापर्यंत पसरू शकते आणि 48 तासांच्या आत संसर्ग झालेल्या रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो."

किकुची म्हणतात की, संसर्गाचा सध्याचा दर पाहता, जपानमध्ये अशा प्रकरणांची संख्या यावर्षी 2,500 पर्यंत पोहोचू शकते. यामध्ये मृत्युदर 30% असू शकतो, जो खूप भयानक आहे. किकुची यांनी लोकांना हाताची स्वच्छता राखण्याचे आवाहन केले आहे आणि खुल्या जखमांवर उपचार करण्याकडे दुर्लक्ष करू नका. हा जीवाणू हातामध्ये आणि नंतर घाणीद्वारे शरीरात प्रवेश करू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT