ग्लोबल

कोरोनावर ‘DNA’ आधारित लस प्रभावी; उंदीर आणि हॅमस्टरवरील प्रयोग यशस्वी

विनायक होगाडे

नवी दिल्ली : जगभरात अनेक देश कोरोनावरील प्रतिबंधक लशीवर संशोधन करीत आहेत. काही लशी उपलब्ध होऊन लसीकरणही सुरू झाले आहे. अशा वेळी तैवानच्या शास्त्रज्ञांनी ‘डीएनए’वर (गुणसूत्रे) आधारित लस तयार केली आहे. उंदीर व हॅमस्टर (मोठ्या घुशीच्या आकारातील उंदीर) वर त्याचा प्रयोग केला असता त्यांच्या शरीरात कोरोनाला दूर ठेवणारी प्रतिपिंडे दीर्घकाळ कार्यक्षम राहत असल्याचे दिसून आले आहे. (DNA based vaccine effective on corona Experiments on rats and hamsters successful)

तैवानमधील ‘नॅशनल हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूट्स’मधील संशोधकांनी ‘सार्स-सीओव्ही-२’वर परिणामकारक ठरणारी ‘डिएनए’युक्त लस विकसित केली आहे. ‘पीएलओएस निगलेक्टेड ट्रॉपिकल डिसीज या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या लेखात संबंधित लशीच्या यशस्वी संशोधनाची माहिती दिली आहे. कोरोनावरील ज्या लशी सध्या उपलब्ध आहेत त्यात ‘सार्स-सीओव्ही-२’ विषाणू शोधण्यासाठी मानवी रोगप्रतिकारक प्रणालीतील रायबोज न्यूक्लिक ॲसिड (आरएनए) किंवा ‘एमआरएनए’वर अवलंबून राहावे लागते. बहुतेक विषाणूंमध्ये आनुवंशिक घटकाच्या रूपात ‘आरएनए’ किंवा ‘डिएनए’ असते. ‘सार्स-सीओव्ही-२’ विषाणूत ‘आरएनए’आढळले आहे. न्यूक्लेइक आम्ल हे एकेरी व दुहेरी पेडीत असू शकते. मानवी पेशीत घुसून संसर्ग फैलावणाऱ्या विषाणूंमधील गुणसूत्रांचा या लशीसाठी वापर केला आहे. विषाणूंविरोधात रोगप्रतिकार प्रतिसाद वाढविण्यासाठी ‘डिएनए’ व ‘एमआरएनए’ या दोन्ही प्रकारच्या लशींमध्ये अनुवांशिक घटकांचा वापर केला जातो.

संशोधकांचा दावा

-‘डिएनए’ लशीची निर्मिती सातत्याने, वेगाने व कमी किमतीत होऊ शकते

- लशीच्या वाहतुकीसाठी थंड तापमानाचीही गरज नाही

- वैद्यकीय चाचण्यांमध्ये ‘डिएनए’ लस ‘एचआयव्ही-१’, झिका, इबोला व एन्फ्ल्युएन्झा अशा विषाणूंसह अन्य संसर्गजन्य रोगांवर अधिक परिणामकारक व सुरक्षित

- ही लस टोचलेल्या उंदीर व हॅमस्टरमध्ये दीर्घकाळपर्यंत प्रतिपिंड तयार झाली

- लसीकरणानंतर आठ आठवड्यांत प्रतिपिंडे तयार होतात अन २० आठवड्यांपर्यंत त्यांची कार्यक्षमता उच्च असते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT