अमेरिकेने मंगळवारी आपल्या नागरिकांना भारतात प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगायचा सल्ला दिला आहे. तसेच जम्मू-काश्मीर आणि भारत-पाकिस्तान सीमेच्या 10 किमीच्या आत प्रवास न करण्याचा सल्लाही अमेरिकेने आपल्या नागरिकांना दिला आला आहे. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) ने सोमवारी भारतासाठी कोविड-19 प्रवास नियम शिथिल करून ते स्तर 3 (उच्च धोका) वरून स्तर 1 (कमी धोका) मध्ये बदलले आहे. यूएस डिपार्टमेंट ऑफ स्टेटने म्हटले आहे की, सीडीसीने COVID-19 मुळे लेव्हल 1 ट्रॅव्हल हेल्थ नोटिस प्रसिद्ध केली आहे, जी देशातील कोविड-19 ची कमी झालेलं प्रमाण दर्शवते. भारतातील परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे अमेरिकेला वाटते. (Do not travel near the Indo-Pak border; US advises its citizens)
मात्र, अमेरिकेने आपल्या नागरिकांना जम्मू-काश्मीर आणि भारत-पाक सीमेवर प्रवास करू नये असे सांगितले आहे. यूएस स्टेट डिपार्टमेंटने आपल्या ताज्या ट्रॅव्हल अॅडव्हायझरीमध्ये म्हटले आहे की, आजकाल गुन्हेगारी आणि दहशतवादामुळे भारताचा त्रास थोडा वाढला आहे. विशेषत: नियंत्रण रेषेजवळ आणि काश्मीर खोऱ्यातील श्रीनगर, गुलमर्ग आणि पहलगाम या पर्यटन स्थळांमध्ये तुरळक हिंसाचार होत आहे. भारत सरकार विदेशी पर्यटकांना (Tourism) नियंत्रण रेषेच्या काही भागात जाण्यास मनाई करते. सीमेच्या दोन्ही बाजूंना भारत आणि पाकिस्तानचे मजबूत सैन्य आहे. यामुळे अमेरिकेने आपल्या नवीन प्रवासी एडव्हायजरीमध्ये आपल्या नागरिकांना या सूचना दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.