प्रत्येक व्यक्ती जगण्यासाठी आणि आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी मेहनत करत असतो. मात्र काहीही न करण्याचे तुम्हाला कोणी पैसे देईल हा विचारही तुम्हाला मुळात कधीही न पडणाराच ठरतो. शोजी मोरिमोटो या 38 वर्षीय जपानी व्यक्ती काहीही न करण्याचे पैसे कमावतोय. गेल्या चार वर्षापासनं तो हा व्यवसाय यशस्वीपणे चालतोय. त्याची काहीही न करणे आणि त्यासाठी पैसे घेण्याची कॉन्सेप्ट ऐकून तुम्हीही चकीत व्हाल. (Japanese Do Nothing Rent-a-Man)
कामाचा कंटाळा केल्यास काम करत नाही अश्या भरपूर तक्रारी तुम्ही ऐकत असालच. शोजी मोरिमोटोनेही त्याच्याबाबत अश्याच अनेक तक्रारी लहानपणापासून ऐकल्या होत्या. २०१८ मध्ये जेव्हा शोजीच्या हाती कुठलेही काम नव्हते तेव्हा त्याने हा व्यवसाय सुरू केला होता. आणि आता शोजी काहीही न करता लाखोंची कमाई करतोय.
‘do-nothing’ rent-a-man' ही संकल्पना तुमच्यासाठी नवीनच असेल. माहितीसाठी ही संकल्पना शोजी मोरिमोटोने २०१८ मध्ये अमलात आणली. या संकल्पनेमध्ये जो कोणी त्याला पैसे देईल त्या व्यक्तीस तो स्वत:ला भाड्याने देईल. मात्र यावेळी तो काहीही करणार नाही. तो फक्त ज्या व्यक्तीने त्याला पैसे दिले आहे त्याच्यासोबत फिरेल, शॉपिंग करेल आणि त्याचं म्हणणं ऐकून घेईल . आणि त्यासाठीच तो पैसे घेणार. त्याच्या या व्यवसायासाठी त्याने ट्विटरवर ‘do-nothing’ rent-a-man' नावाचा एक पेजही बनवलाय.
हे करत असताना शोजीला अनेकांनी न्यूड पोजिंगसाठी तसेच हॉरर ठिकाणी भेटी देण्यासाठी पैसे ऑफर केले होते. मात्र त्याने ते नम्रपणे नाकारले. तो काहीही न करण्याचे पैसे घतो असे त्याचे म्हणणे आहे. त्याच्या या गोष्टीनेच तो जपानमध्ये प्रसिद्ध झालाय. एकट्या लोकांना कंपनी देणे त्यांच्यासोबत हॉटेलमध्ये फिरणे त्यांचा एकटेपणा त्यांच्या सोबत फिरत दूर करणे या गोष्टींचे तो पैसे घेत असतो. एका वेळी तो ६६४१ रुपये घतो. आतापर्यंत त्याने लाखो कमवले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.