ग्लोबल

शिखांनी एअर इंडिया विमानातून प्रवास करु नये; वर्ल्डकप फायनलवेळी मोठ्या हल्ल्याची खलिस्तानी पन्नूची धमकी

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- खलिस्तानी चळवळ आणि शीख फॉर जस्टिसचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याने एक नवा व्हिडिजो जारी केला आहे. त्याने १९ नोव्हेंबर रोजी एअर इंडिया विमानावर हल्ला करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. (Do noy Fly Air India On Nov 19 Khalisthani Terrorist Pannun Tells Sikhs Hints At Attacking Airline On Day Of CWC Final Watch)

शीख फॉर जस्टिसचे वॉटरमार्क असलेल्या व्हिडिओमध्ये पन्नू म्हणतोय की, शीख समुदायाला मी एअर इंडिया विमानातून प्रवास न करण्याचा सल्ला देतोय. १९ नोव्हेंबरला आम्ही एअर इंडिया ऑपरेट होऊ देणार नाही. त्यामुळे माझा शीख समुदायाला सल्ला आहे की त्यांनी १९ नोव्हेंबरला विमानाने प्रवास करु नये. कारण यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

19 नोव्हेंबर रोजी भारत सरकार शिखांवर करत असलेले अत्याचार सर्व जग पाहील. या दिवशी इंदिरा गांधी विमानतळ बंद करा. पंजाब स्वतंत्र झाल्यानंतर याचे नाव बदलून शहीद बिंत सिंग, शहीद सतवंत सिंग खलिस्तान विमानतळ असं ठेवलं जाईल, असं पनू म्हणाला आहे. बिंत सिंग, सतवंत सिंग हे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे अंगरक्षण होते. त्यांनी ३१ ऑक्टोंबर १९८४ रोजी इंदिरा गांधींवर गोळ्या चालवल्या होत्या.

पन्नू म्हणाला की, भारताचे टँक आणि शस्त्रास्त्र काहीही करु शकणार नाहीत. आता स्वतंत्र खलिस्तान अस्तित्वात येईल. पन्नूने याआधी अहमदाबादमधील मोदी स्टेडियम उडवून देण्याची धमकी दिली होती. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येनंर भारत आणि पंतप्रधान मोदींना त्याने धोक्याचा इशारा दिला होता.

वर्ल्डकप सुरु होण्याआधी पन्नूने एक व्हिडिओ जारी केला होता. यात त्याने म्हटलं होतं की, ५ ऑक्टोबरला पहिला वर्ल्डकप सामना होणार आहे. यावेळी मोदी स्टेडियम उडवण्यात येईल. यावेळी वर्ल्ड कप नाही तर वर्ल्ड टेरर कप होईल असं तो म्हणाला होता. आता त्याच्या नव्या व्हिडिओमुळे चिंता वाढणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT