Ukraine Crisis : रशिया- युक्रेन युद्धाचे (Russia-Ukraine War News) कित्येक फोटो व्हिडिओ समोर येत आहे, यापैकी काही रडवणारे, तर काही विचार करायला भाग पाडणारे आहेत. दरम्यान, एक असाच एक हॉस्पिटलमधील व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरूण जोडपे हॉस्पिटलच्या युनिफार्मध्ये लग्न करत आहे. लग्न करणारे नवरा-नवरी हे पेशाने डॉक्टर आहे. (Doctor Couple married in hospital during Russian-Ukraine war)
या व्हिडिओ मिडिया आउटलेट Nexta (Belarusian Media Outlet) तर्फे शेअर केला आहे, ज्यामध्ये तरुण डॉक्टरांचे जोडपे हॉस्पिटलमध्ये एकमेकांसोबत जगण्या-मरण्याच्या शपथा घेत आहे. व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला असून, किव्ह येथे डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला'' असे कॅप्शन दिले आहे.
व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्ही भावूक होऊ शकता. किव्हमध्ये प्रत्येक ठिकाणी बॉम्ब हल्ला आणि मिसाईल टाकल्या जात आहे. दरम्यान या काळात हातात हात घेऊन जोडपे एकमेकांसोबत जगण्या-मरण्याची शपथ घेत आहे. त्यांच्या समोर उभा एक व्यक्ती या विधी पूर्ण करत आहे. त्यांच्या बाजूला एक महिला आणि हॉस्पिटलमधील काही लोक दिसत आहे. लग्नाच्या विधी पूर्ण होताच सर्वजण जोडप्याला शुभेच्छा देत आहे.
युक्रेनमध्ये अशा प्रकारचे फोटो पहिला नाही. मागील आठवड्यामध्ये राजधानी कीव्ह मध्ये आणखी एका जोडप्याने अशा वेळी लग्न केले होते जेव्हा रशिनेयाने युक्रेनवर एअरस्ट्राईक सुरु केली होती. देशाची स्थिती पाहता या जोडप्याने लग्नाच्या काही वेळानंतर हातामध्ये बंदूक घेऊन स्थानिक प्रादेशिक संरक्षण केंद्रामध्ये पोहचले होते. त्यांनी सांगतिले की, ''त्यांना त्यांचे भविष्य काय असेल माहित नाही पण ते एकत्र जीव देऊ शकतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.