ग्लोबल

Donald Trump : शूटरच्या निशाण्यावर केवळ ट्रम्पच नव्हते.. क्रूक्स प्लॅनमध्ये यशस्वी झाला असता तर सभेचं झालं असतं स्मशान

संतोष कानडे

Donald Trump Attack Updates : अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला करणारा २० वर्षीय थॉमस मैथ्यू क्रुक्स याचे मनसुबे आता तपासामध्ये पुढे आलेले आहेत. त्याचा प्लॅन यशस्वी ठरला असता तर सभास्थळ स्मशानभूमीमध्ये बदलून गेलं होतं.

सीएनएच्या रिपोर्टनुसार ट्रम्प यांच्यावरील हल्ल्ल्याचा तपास करणाऱ्या एजन्सीज् शूटरचे मनसुबे जाणून घेण्याच्या दृष्टीने तपास करत आहे. गोळीबार करण्यापूर्वी थॉमस मैथ्यू क्रुक्स कोणाकोणाला भेटला, कुठेकुठे गेला, कोणाशी बोलला; असा तपास सुरु असून तो कुठल्या गुन्हेगारी गटासोबत काम करत होता का? हे शोधलं जात आहे.

तपासामध्ये अधिकाऱ्यांना जो पुरावा सापडला आहे, तो धक्कादायक आहे. ट्रम्प यांच्यावर झालेला हल्ला हा अचानक घडलेला प्रसंग नाही. २० वर्षाच्या या शूटरने हल्ल्याचं प्लॅनिंग खूप अगोदर केलेलं होतं. हल्ल्याच्या अगोदर तो शूटिंग रेंजला गेला. तिथे त्याने फायरिंगचा सराव केला. नंतर तो एका होम डेपोमध्ये गेला आणि त्याने ५ फुटांची एक शिडी खरेदी केली.

पुढे बंदुकीच्या दुकानात जाऊन त्याने ५० राऊंड गोळ्या खरेदी केल्या. हल्ल्यापूर्वी तो आपल्या मूळगावी पिट्सबर्ग येथेही गेला होता. तिथे तो अनेक ठिकाणांवर थांबला आणि लोकांसोबत गप्पा मारल्या. हल्ल्याच्या दिवशी क्रूक्स आपल्या हुंडई सोनाटा कारने पेन्सिल्वेनियामध्ये ट्रम्प यांच्या रॅलीच्या ठिकाणी पोहोचला.

क्रूक्सने आपली कार सभास्थळाच्या बाहेर उभी केली. याच कारमध्ये एक आयईडी उपकरण ठेवलेलं होतं, ते ट्रान्समिटरने जोडलेलं होतं. शिडीचा उपयोग करुन तो जवळच्या इमारतीवर चढला आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळ्या झाडल्या.

तपास एजन्सींनी जेव्हा शूटरच्या फोन तपासला तेव्हा त्याची इंटरनेट सर्च हिस्ट्री तपासली. याशिवाय त्याच्या बेडरुमचा कोनाकोपरा तपासला, त्याच्या कुटुंबियांशी आणि मित्र परिवाराशी चौकशी केली. त्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.

तपासामध्ये पुढे आलेल्या माहितीनुसार, क्रूक्स याला कम्प्युटर कोडिंग आणि गेमिंगमध्ये रस होता. हल्ल्ल्यावेळी क्रूक्सच्या शरीरावर एक रिमोट कंट्रोल डेटोनेटर होतं. त्याच्या कारमध्ये स्फोटकं होतीच, ती रिसीव्हरशी जोडलेली होती. यावरुन स्पष्ट होतंय की, शूटर दूरवरुन स्फोट घडवून आणणार होता. गोळीबार करुन तो लक्ष विचलित करणार होता, असंही म्हटलं जातंय. तसं झालं असतं तर सभास्थळी मोठा अनर्थ घडला असता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hatkanangale Assembly Election 2024 Results : हातकणंगले मतदारसंघात महायुतीच्या अशोकराव मानेंनी 46 हजार 397 मतांनी मिळवला विजय

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना आमदारही बनता येईना ; निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का !

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ठाण्यात केदार दिघेंचे डिपोझिट जप्त

Dilip Sopal won Barshi Assembly Election : बार्शीमध्ये दिलीप सोपलचं! शिवसेना शिंदेच्या राजेंद्र राऊतचा पराभव

Rais Shaikh Won In Bhiwandi East Assembly Election : भिवंडी पूर्वेत रईस शेख विजयी; शिवसेनेच्या संतोष शेट्टींचा मोठ्या फरकाने पराभव

SCROLL FOR NEXT