Donald Trump sakal
ग्लोबल

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प ३४ गुन्ह्यांमध्ये दोषी; शिक्षेवर होणार ११ जुलैला सुनावणी

डोनाल्ड ट्रम्पनी पॉर्नस्टारला दिलेल्या पैशांच्या नोंदी लपविल्याचा आरोप सिद्ध

पीटीआय

न्यूयॉर्क - गुपिते न फोडण्यासाठी पॉर्नस्टार महिलेला पैसे देऊन त्याबाबतच्या नोंदी लपविल्याप्रकरणी दाखल झालेल्या सर्व ३४ गुन्ह्यांमध्ये मॅनहटन न्यायालयाने अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरविले आहे. यामुळे गुन्ह्यात दोषी ठरलेले ट्रम्प हे अमेरिकेचे पहिलेच माजी अध्यक्ष ठरले आहेत. त्यांच्या शिक्षेवर ११ जुलैला सुनावणी होणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प हे २०१६ मध्ये सर्वप्रथम अध्यक्षीय निवडणुकीसाठी रिंगणात होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरील प्रेमसंबंधांबाबत जाहीरपणे बोलू नये, त्यामुळे प्रचारावर परिणाम होऊ शकतो, म्हणून ट्रम्प यांच्या वकिलांनी पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनिएल्स यांना २०१६ मध्येच एक लाख तीस हजार डॉलर दिले होते. ही निवडणूक जिंकत ट्रम्प हे अमेरिकेचे अध्यक्ष बनले होते.

मात्र, २०१८ मध्ये एका वृत्तपत्राने प्रेमसंबंधांचे आणि पैशांचा व्यवहार झाल्याचे उघड केले. या व्यवहाराच्या नोंदी लपविण्यासाठी ट्रम्प यांनी आर्थिक नोंदींमध्ये फेरफार करत सरकारची फसवणूक केल्या प्रकरणी ट्रम्प यांच्याविरोधात ३४ गुन्हे दाखल झाले होते.

ट्रम्प यांनी डॅनिएल्स यांना दिलेले पैसे हा कायदेशीर बाबींसाठी झालेला खर्च म्हणून दाखविले होते. हा निवडणूक कायद्याचा भंग असल्याचा सरकारी पक्षाचा दावा मॅनहटन न्यायालयाने मान्य केला. बारा ज्युरींच्या मंडळाने एकमताने ट्रम्प यांना दोषी ठरविले. या निकाला ट्रम्प हे आव्हान देण्याची दाट शक्यता आहे.

‘खरा निकाल’ निवडणुकीत

सहा आठवडे चाललेल्या या सुनावणीमध्ये स्टॉर्मी डॅनिएल्स यांच्यासह २२ साक्षीदारांची साक्ष तपासली गेली. ट्रम्प यांच्याबरोबर लैंगिक संबंध होते, असा त्यांचा आरोप सुनावणीच्या केंद्रस्थानी होता. न्यायाधीश निकाल वाचून दाखवत असताना ट्रम्प शांत बसले होते.

मात्र, कोर्टरुमच्या बाहेर येताच पत्रकारांशी बोलताना त्यांनी या निकालात ‘हेराफेरी’ झाल्याचा आणि ‘लाजिरवाणी सुनावणी’चा आरोप केला. तसेच, ‘खरा निकाल’ निवडणुकीतूनच स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले. बायडेन प्रशासनानेच हे सर्व घडवून आणले असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला.

निवडणुकीला अडथळा नाही

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शिक्षेवर ११ जुलैला, म्हणजे रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवार म्हणून ट्रम्प यांच्या नावाची अधिकृतरित्या घोषणा होण्याच्या चार दिवस आधी, सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे ट्रम्प यांना अध्यक्षीय निवडणूक लढविण्यात कोणताही अडथळा येणार नाही.

अमेरिकेतील कायद्यानुसार, अध्यक्षीय निवडणूक लढविण्यासाठी फारच मर्यादित अटी (वयाची ३५ वर्षे पूर्ण, जन्माने अमेरिकी नागरिक आणि मागील १४ वर्षांपासून अमेरिकेतच वास्तव्य) आहेत. मात्र, रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांमध्ये त्यांच्याबद्दल नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS 1st Test: नाद खुळा... जसप्रीत बुमराहच्या नेतृत्त्वाखाली भारताने इतिहास रचला, ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला

Latest Maharashtra News Updates : उद्धव ठाकरे आमदारांकडून घेणार प्रतिज्ञापत्र; पुन्हा पक्ष फुटीची भीती

'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत सिंबा देतोय कॅन्सरशी झुंज ; मालिकेतील ट्विस्टमुळे प्रेक्षकांच्याही डोळ्यात आलं पाणी

Kolhapur: पक्ष बदलूनही अपयश आलेल्या नेत्यांची वाटचाल कशी राहणार? वेगळा विचार करण्याशिवाय आता पर्यायच उरला नाही!

IPL 2025 Mega Auction Highlights: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

SCROLL FOR NEXT