donald trump esakal
ग्लोबल

Donald Trump: ''कमला हॅरिस सुमार दर्जाच्या उमेदवार'', ज्यो बायडेन यांचं नाव घेऊन ट्रम्प यांची टीका

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन: कमला हॅरिस या अत्यंत सुमार दर्जाच्या उमेदवार असून अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यापेक्षाही त्या अधिक अकार्यक्षम आहेत, अशी टीका रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केली. कमला हॅरिस या अत्यंत कट्टर डाव्या विचारसरणीच्या असल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला.

प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांनी आज ‘एक्स’ या सोशल मीडियावर ट्रम्प यांची थेट मुलाखत घेतली. तांत्रिक अडथळे आल्याने नियोजित वेळेपेक्षा चाळीस मिनिटे उशिराने सुरू झालेल्या या मुलाखतीत ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षावर सडेतोड टीका केली.

ट्रम्प म्हणाले,‘‘हॅरिस यांना माझ्यापेक्षाही अधिक ‘ट्रम्प’ बनायचे आहे. पण त्या अत्यंत सुमार दर्जाच्या उमेदवार आहेत. बायडेन यांच्याकडून उमेदवारी काढून घेणे हा डेमोक्रॅटिक पक्षात झालेला कटच होता. हॅरिस या बायडेन यांच्यापेक्षाही अकार्यक्षम आहेत. त्या अत्यंत हटवादी असून टोकाच्या डाव्या विचारसरणीच्या आहेत. साडेतीन वर्षांत त्यांनी देशासाठी काहीही केले नाही आणि उरलेल्या अर्ध्या वर्षातही त्या काही करू शकणार नाहीत.’’ हॅरिस यांचे विचार डावे असल्याच्या ट्रम्प यांच्या विधानाला मस्क यांनीही पुष्टी दिली.

आजच्या मुलाखतीद्वारे ट्रम्प यांचे ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) पुनरागमन झाले आहे. चार वर्षांपूर्वी निवडणूक निकालावेळी समर्थकांनी घातलेल्या धुडगूसानंतर ट्रम्प यांना ‘ट्विटर’ने ‘ब्लॉक’ केले होते.

देशात दररोज हजारो लोक बेकायदा मार्गाने घुसखोरी करत असून सीमा सुरक्षेच्या बाबतीत बायडेन सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा दावा ट्रम्प यांनी मुलाखतीवेळी केला. कायदेशीर स्थलांतराला माझा विरोध नसल्याचेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले. सरकारच्या खराब धोरणामुळेच अमेरिकेतील गुन्हेगारी वाढल्याचा दावा ट्रम्प आणि मस्क या दोघांनी केला. जगासमोर पर्यावरण बदल हा नाही, तर अण्वस्त्रांचा धोका सर्वांत मोठा आहे, असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले.

पुतीन, जिनपिंग यांचे कौतुक
डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन सरकारच्या परराष्ट्र धोरणावरही सडकून टीका केली. मी देशाचा अध्यक्ष असतो तर सध्या जगात जी युद्धे सुरू आहेत, ती झालीच नसती, असा दावाही ट्रम्प यांनी केला. अमेरिकेचे कट्टर विरोधक असलेले रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि उत्तर कोरिया अध्यक्ष किम जोंग उन यांचे ट्रम्प यांनी कौतुक केले. आपल्याच देशात रशिया आणि चीनपेक्षा धोकादायक लोक आहेत, असेही ट्रम्प म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Nashik Vidhan Sabha Election: ओझरला रात्री साडेदहापर्यंत मतदान; सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरीच्या मतपेट्या मध्यरात्री जमा

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लाबुशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT