Donald Trump 
ग्लोबल

Donald Trump: मी जर हरलो तर अमेरिकेत रक्तपात... डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला थेट इशारा

USA Election November: ओहिओमध्ये सिनेटर पदाचे उमदेवार बार्नी मोरेनो यांच्या प्रचारसभेत बोलताना ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं आहे.

कार्तिक पुजारी

वॉशिंग्टन- अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका सभेला संबोधित करताना थेट रक्तपाताचा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, 'नोव्हेंबर महिन्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या निवडणुका होत आहे. यावेळे ते अध्यक्ष झाले नाहीत तर देशात मोठा रक्तपात होईल.' (Donald Trump has warned that there will be a bloodbath if he loses in November )

ओहिओमध्ये सिनेटर पदाचे उमदेवार बार्नी मोरेनो यांच्या प्रचारसभेत बोलताना ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं आहे. ट्रम्प ऑटो इंडस्ट्रीबाबत बोलत होते. यावेळी त्यांनी रक्तपाताचा उल्लेख केला. ते म्हणाले की, तुम्ही ५ नोव्हेंबर ही तारीख लक्षात ठेवा. ही तारीख खूप महत्वाची ठरणार आहे. अमेरिकेच्या इतिहासातिल सर्वात वाईट राष्ट्रपती जो बायडेन आहेत.

चीनवर देखील टीका

चीन मॅक्सिकोमध्ये कार बनवू पाहात आहे. तसेच ते अमेरिकेत विकण्याचा त्यांचा इरादा आहे. मी जर अध्यक्ष झालो तर असं होऊ देणार नाही. मी जर जिंकलो नाही तर सर्व देशामध्ये रक्तपात होईल, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. बायडेन यांचा कार्यकाळ सर्वाधिक भयानक आहे. त्यांची इमिग्रेशन पॉलिसी चुकीची आहे, असा हल्लाबोल डोनाल्ड ट्रम्प यांनी केला

जो बायडेन यांची प्रतिक्रिया

जो बायडेन म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प हे देशाचा अपमान करत आहेत. देशाची प्रतिमा त्यांच्यामुळे खराब होत आहे. यावेळच्या निवडणुका अमेरिकेच्या लोकशाहीचे भाग्य ठरवतील. ६ जानेवारीची घटना लक्षात घेता ट्रम्प किती घातक आहेत हे लक्षात येईल.

अमेरिकेत कोण होणार विजयी?

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होत आहेत. रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाकडून जो बायडेन हे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. दोघांमध्ये थेट निवडणूक होईल हे जवळपास निश्चित आहेत. ७७ वर्षीय डोनाल्ड ट्रम्प आणि ८१ वर्षीय जो बायडेन यांच्यामध्ये कोण विजयी होईल याबाबत उत्सुकता आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वात वयस्कर अध्यक्षपदाचे उमेदवार समोरासमोर आले आहेत (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT