Donald Trump sakal
ग्लोबल

Donald Trump : हल्लेखोर जवळ आला कसा?सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरू; त्रुटी राहिल्याचा आरोप

मेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झाल्याने जगभरातून आश्‍चर्य आणि निषेध व्यक्त आहे.

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झाल्याने जगभरातून आश्‍चर्य आणि निषेध व्यक्त आहे. हल्लेखोराकडून गोळीबार सुरू असतानाच सुरक्षा रक्षकांनी त्याला हेरून तातडीने त्याला ठारही मारले. मात्र, एक हल्लेखोर रायफल घेऊन ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्याइतपत जवळ आलाच कसा, याचा तपास सुरक्षा यंत्रणा करत आहेत. ट्रम्प यांच्यावर हल्ला होणे, ही सुरक्षेतील मोठी त्रुटी असल्याचे मानले जात आहे.

थॉमस मॅथ्यू क्रूक नावाच्या वीस वर्षांच्या हल्लेखोराने गोळीबार केल्याचे ‘एफबीआय’ने सांगितले. माध्यमांनी विविध छायाचित्रे, व्हिडिओ आणि उपग्रहांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे केलेल्या विश्र्लेषणानुसार, हल्लेखोर हा सभास्थानापासून तीनशे फुटांच्या आसपास इतक्या कमी अंतरावरील एका छतावर आडवा पडलेला होता. त्याच्या हातात रायफल होती. ‘एआर-१५’ या प्रकारची ही रायफल अत्याधुनिक आहे. या रायफलीमधून दीडशे मीटरवरून व्यक्तीला गोळी मारल्यास त्याचा मृत्यू होऊ शकतो. हल्लेखोराने गोळीबार सुरू करण्याआधीही काही जणांनी त्याला पाहिले होते आणि त्याच्याकडे रायफल असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. मात्र, हल्लेखोराने लगेचच गोळीबार सुरू केला. यामुळे गोंधळ निर्माण होताच ट्रम्प यांच्या उजव्या बाजूला उंच ठिकाणी तैनात असलेल्या सैनिकाने अचूक निशाणा साधत हल्लेखोराला डोक्यात गोळी मारून ठार केले.

ट्रम्प यांच्या सभेसाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था होती. उच्च दर्जाच्या दुर्बिणीद्वारे दूर अंतरापर्यंत लक्ष ठेवले जात होते. असे असतानाही त्यांच्या नजरेतून हल्लेखोर कसा सुटला, याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

धक्कादायक घटना’

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ला म्हणजे अमेरिकेच्या इतिहासातील धक्कादायक घटना असल्याचे अमेरिकेतील प्रसार माध्यमांनी म्हटले आहे. अमेरिकेत राजकीय हिंसाचार वाढला असून त्यामुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला असल्याचेही माध्यमांनी म्हटले आहे. ‘राजकीय हिंसाचाराला विरोध करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी, नेत्यांनी आणि जनतेने एकत्र येण्याची गरज आहे. या देशासमोरील हे नव्हे आव्हान ओळखावे. हिंसाचारामुळे अमेरिकेतील राजकीय जीवनावर विपरीत परिणाम होत आहे,’ असे आवाहन माध्यमांनी केले आहे.

मोदींकडून हल्ल्याचा निषेध

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध व्यक्त केला आहे. राजकारण आणि लोकशाही यामध्ये हिंसाचाराला कोणतेही स्थान नाही, असे मोदींनी स्पष्टपणे सांगितले. ट्रम्प हे त्यांना झालेल्या दुखापतीतून लवकर बरे व्हावेत, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या हल्ल्यावर टीका केली आहे. अशा प्रकारच्या घटनांचा तीव्र शब्दांत निषेध होणे आवश्‍यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

जागतिक नेत्यांच्या प्रतिक्रिया

  • कीर स्टार्मर (पंतप्रधान, ब्रिटन) : आपल्या समाजामध्ये राजकीय हिंसाचाराला कोणतेही स्थान नाही. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्यांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो.

  • इमॅन्युएल मॅक्रॉन (अध्यक्ष, फ्रान्स) : हा हल्ला म्हणजे लोकशाहीसाठी एक शोकांतिकाच आहे.

  • अँथोनी अल्बानीज् (पंतप्रधान, ऑस्ट्रेलिया) : लोकशाही मूल्यांवर झालेला हा निंदनीय हल्ला आहे. लोकशाही आणि स्वातंत्र्य ही दोन मूल्ये म्हणजे अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाला जोडणारा दुवा आहेत.

  • जॉर्जिया मेलोनी (पंतप्रधान, इटली) : द्वेष आणि हिंसाचार यापेक्षा अमेरिकी जनता चर्चा आणि संवादाला अधिक महत्त्व देईल, अशी आशा आहे.

  • व्होलोदोमिर झेलेन्स्की (अध्यक्ष, युक्रेन) : जगात कोणत्याही भागात झालेल्या हिंसाचाराचे समर्थन करता येणार नाही. हिंसेचा कधीही विजय होत नाही.

  • फ्युमिओ किशिदा (पंतप्रधान, जपान) : लोकशाहीला आव्हान देणाऱ्या हिंसाचाराविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची आवश्‍यकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Maharashtra Election 2024 : उल्हासनगर परिमंडळातील 8 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 24 ड्रोनचा वॉच, मतदान प्रक्रियेसाठी कंबर कसली

Leopard Attack : चिमुकल्याच्या मृत्यूमुळे आई-वडिलांचा टाहो; एका महिन्यात तीन बळी

Sanapwadi Village Voting : स्वातंत्र्याच्या सत्त्याहत्तर वर्षानंतर प्रथमच सानपवाडीकर करणार स्वतःच्या गावांत विधानसभेसाठी मतदान

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

SCROLL FOR NEXT