Donald Trump Mugshot : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष यांना आज अटक करण्यात आली होती. त्यानंतर 2 लाख डॉलर्सच्या बाँडवर त्यांची सुटका करण्यात आली. यानंतर ट्रम्प यांनी 'एक्स' (आधीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील तब्बल अडीच वर्षांनंतर पुनरागमन केलं.
ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. दोन आठवड्यांपूर्वी न्यायालयाने त्यांच्यासह आणखी 16 जणांविरोधात न्यायालयाने अरेस्ट वॉरंट जारी केलं होतं. तसंच या सर्वांना सरेंडर करण्यासाठी 25 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, ट्रम्प यांनी सरेंडर न केल्यामुळे त्यांना आज अटक करण्यात आली.
अटक केल्यानंतर प्रत्येक गुन्हेगाराचे रेकॉर्डला लावण्यासाठी जे फोटो काढले जातात; त्यांना मगशॉट म्हणतात. ट्रम्प यांना अटक केल्यानंतर त्यांचाही असाच मगशॉट काढण्यात आला. फुटॉन काऊंटी जेलने हा फोटो शेअर केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनीही आपल्या एक्स हँडलवर हा मगशॉट पोस्ट केला आहे.
ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये स्वतःचा मगशॉट आणि स्वतःच्या वेबसाईटची लिंक दिली आहे. यामध्ये त्यांनी स्वतःवरील आरोपही नमूद केले आहेत. शिवाय, 'नेव्हर सरेंडर' असं म्हणत त्यांनी आपण हे आरोप मान्य करत नसल्याचे संकेत दिले आहेत.
2021 साली प्रक्षोभक पोस्ट केल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचं एक्स खातं बंद करण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर मधल्या काळात एक्स कंपनीच इलॉन मस्कने विकत घेतली. यानंतर 2022 च्या नोव्हेंबरमध्ये मस्कने ट्रम्प यांचं अकाउंट पुन्हा सुरू केलं होतं. अखेर, आज ट्रम्प यांनी आपल्या एक्स अकाउंटवरुन पोस्ट केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.