अबूधाबी : संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) एक मोठा हल्ला झाल्याचं वृत्त आहे, विशेष म्हणजे या हल्ल्यामध्ये दोन भारतीय व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. अबुधाबीच्या नव्या विमानतळावर (AbuDhabi new Airport) सोमवारी हा हल्ला झाला असून तो ड्रोनमधून करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. इराणमधील हैती बंडखोरांनी (Houthi Rebels) या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. (Drone attack Abu Dhabi new airport Yemen Houthi movement claims responsibility)
अबुधाबी विमानतळावरील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अभुधाबीच्या आंतरऱाष्ट्रीय विमानतळावर सोमवारी दोन स्फोट झाले. हे दोन्ही स्फोट ड्रोनच्या सहाय्यानं घडवून आणल्याचं बोललं जात आहे. या स्फोटांनंतर विमानतळावर आग लागली होती. या हल्ल्यामध्ये २ भारतीय प्रवाशी आणि एका पाकिस्तानी प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, तर इतर सहाजण जखमी झाले आहेत, युएईतील भारतीय राजदूत संजय सुधीर यांनी याला दुजोरा दिला आहे.
दरम्यान, युएईच्या पोलीसांकडून या प्रकरणी चौकशी सुरु करण्यापूर्वीच इराणमधील हैती बंडखोरांनी याची जबाबदारी घेतली आहे. या संघटनेनं आपलं निवेदन जाहीर करुन युएईवर हल्ले सुरु करण्याचे आदेशही दिले आहेत.
युएईतील स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, विमानतळावर हे स्फोट अबुधाबीच्या नॅशनल ऑईल कंपनीच्या पेट्रोल घेऊन जाणाऱ्या टँकर्समध्ये झाली. प्राथमिक चौकशीतून हे समोर आलं की, टँकर्सला आग लागण्यापूर्वीच आकाशात ड्रोनसारख्या वस्तू दिसून आल्या होत्या. ज्या दोन भिन्न ठिकाणी कोसळल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.