Drone attack kills Rohingya Muslims 
ग्लोबल

Drone Attack : म्यानमारसोडून पळणाऱ्या रोहिंग्या मुस्लिमांवर ड्रोन हल्ला; २००हून अधिक जणांचा मृत्यू, पीडितांनी सांगितली आपबीती

Drone attack kills Rohingya Muslims fleeing Myanmar : म्यानमारच्या पश्चिमेकडील राज रखाइनमधून बांगलादेशात जात असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांवर ड्रोन हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

रोहित कणसे

म्यानमारच्या पश्चिमेकडील राज रखाइनमधून बांगलादेशात जात असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांवर ड्रोन हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात २००हून अधिक जण मारले गेल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या हल्ल्यातून वाचलेल्या लोकांनी सरकार विरोधी गट 'अराकान आर्मी'ने (The Arakan Army) हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र अराकान आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे. अराकान आर्मी म्यानमारच्या रखाइन जाती समूहाची सैन्य शाखा आहे.

म्यानमार माउंगडॉ येथे अराकान आर्मी आणि म्यानमार सैन्यामध्ये भीषण युद्ध सुरू आहे. ज्यापासून बचावासाठी रोहिंग्या समुदायाचे लोक नदी ओलांडून बांगलादेश मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते.

ही घटना पाच ऑगस्टची असून वैद्यकीय उपचारासाठी मदत करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्था, डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स यांनी ९ ऑगस्ट रोजी एक निवेदन जारी करत याबद्दल माहिती दिली.

त्यांनी सांगितेल की, आम्ही या हल्ल्यात जखमी झालेल्या रोहिंग्यांचे उपचार केले जे सीमा ओलांडून बांगलादेशात येण्यात यशस्वी झाले. या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, काही रोहिंग्या समाजातील लोकांनी सांगितले की जेव्हा ते सीमा ओलांडण्यासाठी नाव शोधत होते तेव्हा त्यांच्यावर बॉम्बफेक करण्यात आली. दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शिने सांगितले की नदीच्या किनाऱ्यावर शेकडो मृतदेह पडले होते.

अमेरिकन न्यूज एजंसी एसोशिएटेड प्रेसशी बोलताना या हल्ल्यात जीव वाचवलेल्या लोकांनी देखील त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे अराकान आर्मी असल्याचे सांगितले आहे. यासोबतच रोहिंग्या कार्यकर्ता आणि म्यानमारचे सैन्य सरकार देखील अराकान आर्मीलाच या हल्ल्यासाठी जबाबदार धरत आहेत.

या ड्रोन हल्ल्यात बचावलेल्या १७ वर्षीय रोहिंग्या तरूणाने सांगितले की, ५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी तो सुमारे हजार रोहिंग्या साथिदारांसोबत बांगलादेश जाण्यासाठी बोटीची वाट पाहात होता. तेव्हा त्याने चार ड्रोन उडताना पाहिले. ड्रोनने तो आणि त्याच्या कुटुंबातील १२ सदस्य उभे होते त्याच ठिकाणी तीन बॉम्ब टाकले. ड्रोनपासून बचावासाठी त्यांनी पाण्यात उड्या घेतल्या. त्या मुलाने सांगितलं की ड्रोन हल्ल्यानंतर तब्बल २० तोफेचे गोळे देखील गर्दीवर डागण्यात आले.

सोशल मीडियावर य़ा हल्ल्याचे हृदयद्रावक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये नदीच्या किनाऱ्यावरील रस्त्यावर अनेक जणांचे मृतदेह विखुरलेले धिसत आहेत. रखाइन भागात सेना आणि बंडखोर गटामध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान अनेक बंधने असल्याने व्हिडीओ आणि हल्ल्याबद्दल माहिती सहजपणे व्हेरिफाय केली जाऊ शकत नाहीये.

नेमकं वाद काय आहे?

लोकशाही समर्थक गोरिल्ला आणि जातीय अल्पसंख्यक आर्म्ड फोर्सेस देशातून लष्करी राजवट संपवण्यासाठी आमनेसामने आहेत. म्यानमारमध्ये लष्कराने २०२१ मध्ये आंग सान सू की यांचे निवडून आलेले सरकार बाजूला करत सत्ता ताब्यात घेतली होती. रखाइनमध्ये सुरू अशलेल्या युद्धात रोहिंग्या अल्पसंख्यकांविरोधात पुन्हा हिंसाचार सुरू होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT