ग्लोबल

दुबई न्यू नॉर्मल: उद्योग, व्यापाराला धक्का न लावता केले नियोजन

धोंडीराम पाटील

कोरोनाचा हाहाकार जगभर माजवला आहे. यावर कंट्रोल करणे खुपच अवघड. यासाठी कितीही नियोजन केले तरी कोरोना काही कमी होत नाही.यामुळे अर्थव्यस्था (Economy) कोलमडली आहे. मात्र दुबईने (Dubai covid fight planning) व्यापाराला धक्का न लावता नियोजन केले. हे नेमके नियोजन काय आहे. तेथील नागरीकांचा काय अनुभव आहे जाणून घेऊया...

Dubai covid fight planning update marathi news

कोरोनाने आम्हाला कठोर वातावरणात आणून सोडलेय. जगातल्या(world country) प्रत्येक देशाने महामारीचा सामना तेथील परिस्थितीला अनुसरून विविध मार्गांनी केला. ज्या देशाची अर्थव्यवस्था ९० टक्के पर्यटनावर अवलंबून आहे, त्या दुबईवर याचा किती वाईट परिणाम झाला असेल, याची कल्पना करा.

-अराफतहुसेन व रुक्सार मुल्ला (सांगली, सध्या बुर्र दुबई)

पण दुबईनेदेखील कोरोनावर मात केली. कठोर प्रशासनाद्वारेच हे शक्य झाले. हे एका रात्रीत घडले नाही. काळजीपूर्वक नियोजन करून, एकाच वेळी होणारी मनुष्यहानी टाळली तर दुस-या बाजूला दैनंदिन व्यवहार, व्यापार, उद्योग, रोजागाराचंही संरक्षण केलं. सूत्रबद्ध नियोजनाने हे शक्य झाले. एप्रिल २०२० मध्ये जगभर कोरोनाची तीव्रता वाढली. तेव्हा दुबईदेखील त्याच स्थितीत होता. सरकारने दुसरा कोणताही विचार न करता रात्री कडक कर्फ्यू लागू केला. अर्थव्यवस्थेवर फार परिणाम झाला नाही. नंतर सरकारने संपूर्ण लॉकडाउन केले. परंतु एक महत्त्वाची बाब म्हणजे अत्यावश्यक काम करू शकत होतो.

आम्ही एका तासासाठी आवश्यक सेवांसाठी बाहेर जाऊ शकत होतो. अर्थव्यवस्थेला थोडा त्रास झाला. कठीण प्रसंगावर मात केली. सरकारने आवश्यक विमान उड्डाणे सुरु ठेवली. काही मर्यादित केली. अन्य सर्व प्रवासी उड्डाणे थांबवण्याचा निर्णय घेतला. आता जवळपास वर्षानंतर दुबईत सर्व काही टप्प्याटप्प्याने सुरू झाले आहे. तरी अजून नियम कठोर आहेत. मास्कचा वापर सर्वत्र आवश्यक करण्यात आला आहे. नियम न पाळल्यास दंडनीय अपराध आहे. तीन हजार दिरहम (६० हजार रुपये) दंड केला जातो. सतत नियम मोडल्यास मोठी शिक्षाही आहे. इथल्या कडक कायद्याच्या कचाट्यातून कोणी सुटू शकत नाही.

मेट्रो किंवा रेस्टॉरंटमध्ये नियमांचे पालन करण्यासाठी मोठ्या संख्येने एकत्र येण्यास मनाई आहे. अधिका-यांकडून कठोर कारवाईची भीती असते. लोकांची नियमित तपासणी केली जाते. सध्या बुर्र दुबई येथे राहतो. दुबई हेल्थ अथॉरिटी (डीएचए) प्रत्येक सरकारी रुग्णालयात उपलब्ध आहे. एखाद्या रुग्णास कोविड झाला असेल आणि लक्षणे किरकोळ असतील तर सात दिवसांसाठी गृहअलगीकरणात राहतो. त्याच्यावर सरकारी आरोग्य व्यवस्थेचे लक्ष असते. लक्षणे गंभीर असल्यास डीएचए स्वतःच रुग्णाला घरात येऊन उपचारासाठी घेऊन जातात. लसीकरण अनिवार्यच केले जात नाही तर ते विनामूल्यदेखील आहे. सर्व खर्च शासनामार्फत केला जात आहे. लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणीच करावी लागते. गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जाते. आता आम्ही परत पूर्णवेळ काम करून रोजीरोटी मिळवत आहोत. कोरोनाने जिथे सोडले तिथे परत आलोत. मास्क वापरणे आणि दुबईही न्यू नॉर्मल होत आहे.

Dubai covid fight planning update marathi news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT