Due to corona epidemic human is five years behind UNDP report sakal
ग्लोबल

कोरोना साथीमुळे माणूस पाच वर्षे मागे; ‘यूएनडीपी’

‘यूएनडीपी’चे मत : मानवी विकास निर्देशांकांत प्रथमच घट; विविध संकटांचाही परिणाम

सकाळ वृत्तसेवा

न्यूयॉर्क : जगभरात हाहाकार माजविणाऱ्या कोरोना विषाणूंच्या साथीमुळे सर्वच देशांचा विकास मार्गच खुंटला. यातून जग हळूहळू सावरत आहे. पण कोरोनासह सतत उद्‍भवलेल्या अन्य मोठ्या संकटांमुळे माणूस पाच वर्षे मागे गेला असून अनिश्‍चिततेची जागतिक लाटच त्यामुळे आली आहे, असे मत संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमा (यूएनडीपी)च्या अहवालात व्यक्त केले.

‘यूएनडीपी’ने स्थापनेपासून ३० वर्षे मानवी विकास निर्देशांक जाहीर केला जातो. या निर्देशांकात प्रथमच असे मत व्यक्त करण्यात आले आहे. कोरोनासारख्या संकटांमुळे देशांचे आयुर्मान, शैक्षणिक पातळी आणि राहणीमानाचा दर्जा खालावला आहे. हे २०२० व २०२१ या दोन वर्षांत याचे प्रमाण सर्वाधिक होते, असे ‘अनसर्टन टाइम्स, अनसेटल्ड लाइव्हज’ या शीर्षकाच्या अहवालात नमूद केले आहे.

‘‘याचा अर्थ आपला मृत्यू लवकर होणार आहे. आपले शिक्षण कमी असेल आणि आपले उत्पन्न कमी होत चालले आहे,’’ अशी प्रतिक्रिया ‘यूएनडीपी’चे प्रमुख एचिम स्टॅनर यांनी दिली. ‘एएफपी’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, की अनेक लोक हताश, निराश का झाले आहेत?, भविष्याबद्दल चिंता का वाटू लागली आहे, याबद्दल केवळ तीन मापदंडाद्वारे आपल्याला समजू शकेल.

जागतिक अनेक दशकांपासून मानवी विकास निर्देशांकात सातत्याने वाढ होत आहे, पण २०२० पासून त्यात घसरण होण्यास सुरुवात झाली. २०२१मध्येही निर्देशांक उतरतात राहिला. यामुळे मागील पाच वर्षांत आपण जे कमावले होते, ते गमावण्याची वेळ आली. जगाचा प्रवास उलट दिशेने होण्यामागे कोरोनाची साथ हे एक मुख्य कारण आहे. पण त्याचबरोबर राजकीय, आर्थिक आणि हवामानविषयक समस्यांमुळेही लोकांना सावरण्यास वेळ मिळाला नाही, असेही अहवालात म्हटले आहे.

अहवालातील निरीक्षणे

  • कोरोनासाथीतून बाहेर येऊन विकासाच्या दिशेने काही देशांचे मार्गक्रमण

  • यशस्वी देशांमध्ये स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड यांचा समावेश आहे

  • दक्षिण सुदान, चाड व नायजेर हे देश तळात आहेत

  • रशिया-युक्रेन युद्धामुळे लॅटिन अमेरिका, आफ्रिकी, दक्षिण आशियाई व कॅरेबियन मधील अनेक देशांपुढे गंभीर संकट

सकारात्मक मुद्दे

  • तीन मुख्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून सुधारणा केल्या होऊ शकतात

  • अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक, भविष्यातील साथींसाठी तयारी, विम्याचा विचार आणि भविष्यातील संकटांना पूर्ण क्षमतेने सामोरे जाण्यासाठी नावीन्यपूर्ण मार्ग शोधणे

रशियाने युक्रेनवर केलेल्या अतिक्रमणामुळे जगात निर्माण झालेल्या खाद्य व ऊर्जा संकटावर या अहवालात प्रकाश टाकलेला नाही. पण २०२२ हे वर्षही संकटमय आहे, यात कोणतीही शंका नाही.’’

- एचिम स्टॅनर, प्रमुख, ‘यूएनडीपी’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT