Some Interesting Facts Of Earth : पृथ्वीला सुर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करायला ३६५ दिवस लागतात, ज्याला आपण एक वर्ष म्हणतो. तर स्वतः भोवती प्रदक्षिणा पूर्ण करायाला २४ तास म्हणजे एक दिवस लागतो असं आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पण तुम्हाला माहित आहे का, की हे एक मिथक आहे. पृथ्वीशी निगडित असे अनेक मिथक आहेत ज्याविषयी dainikbhaskar.com ने दिलेल्या वृत्तानुसार आपण जाणून घेऊया.
अर्थ डे च महत्व
अमेरिकेत १९७० मध्ये पर्यावरणाशी निगडीत मुद्द्यांवर जागरुकता आणण्यासाठी सीनेटर गेलॉर्ड नेल्सनने अर्थ डे ची सुरुवात केली. यासाठी त्यांनी कँपेन चालवलं होतं. यामुळे २२ एप्रिलला संपूर्ण अमेरिकेतून २ कोटी लोक रस्त्यावर उतरले. आजवर या कँपेनने १८४ दोशात ५००० एन्व्हॉर्मेंटल ग्रुप्स जोडले गेले आहेत.
पृथ्वीशी निगडीत मिथक
एका दिवसात २४ तास - नाही एका दिवसात २३ तास, ५६ मिनीटं आणि ४ सेकंदाचा असतो. एवढ्या वेळातच पृथ्वी आपल्या स्वतः भोवती फिरते.
पृथ्वीवर विज कधीकधीच पडते - नाही तर एका सेकंदात १०० वेळा किंवा एका दिवसात ८६ लाख वेळा सुद्धा विज पडते.
पृथ्वीच्या ७० टक्के भागावर पाणी आहे - पृथ्वीच्या वस्तुमानाच्या फक्त ०.०७ टक्के आणि त्याच्या खंडाच्या ०.४ टक्के भागावर पाणी आहे.
चंद्र नसला तरी पृथ्वीवर फरक पडला नसता - चंद्र जर नसता तर दिवस ६ ते ८ तासांचा असता. एका वर्षात ३६५ नाही तर १००० ते १४०० दिवस असते.
पृथ्वीवरचा सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट आहे, ज्याची उंची ८८५० मीटर आहे - माउंट एव्हरेस्टची उंची समुद्र सपाटीपासून ८८५० मीटर आहे. पण पृथ्वीच्या केंद्रापासून अवकाशापर्यंतचं अंतर लक्षात घेतलं तर सर्वात उंच पर्वत इक्वाडेर माउंटचा चिंबोराजो आहे. याची उंची ६३१० मीटर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.