Weapon sakal
ग्लोबल

Weapon Competition : जागतिक शांततेचे प्रयत्न हा केवळ दिखावाच; अण्वस्त्रांवरील खर्चात वाढ

जगभरात विविध ठिकाणी संघर्षामुळे होणारी हानी दिसत असतानाही शस्त्रस्पर्धा कमी झाली नसल्याचे दिसून आले आहे.

पीटीआय

कोपेनहेगन (डेन्मार्क) - जगभरात विविध ठिकाणी संघर्षामुळे होणारी हानी दिसत असतानाही शस्त्रस्पर्धा कमी झाली नसल्याचे दिसून आले आहे. एकीकडे शांततेसाठी प्रयत्न केले जात असताना जगातील नऊ अण्वस्त्रक्षम देशांनी आपल्या अण्वस्त्रांचे आधुनिकीकरण करण्याचा कार्यक्रम सुरूच ठेवला असल्याचे ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च’ (एसआयपीआरएस) या संस्थेने आपल्या अहवालात निदर्शनास आणू दिले आहे. या नऊ देशांनी २०२२ च्या तुलनेत २०२३ या वर्षांत आपल्या अण्वस्त्रांसाठी एकूण १०.७ अब्ज डॉलर अधिक खर्च केल्याचे या अहवालात म्हटले आहे.

शीतयुद्धानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये अण्वस्त्रांची भूमिका इतक्या प्रमाणात वाढली आहे, अशी चिंता ‘एसआयपीआरएस’चे संचालक विल्फ्रेड वॅन यांनी व्यक्त केली आहे. जगात विविध ठिकाणी अण्वस्त्रांचा वापर करण्याचा इशारा दिला जात असून सैन्याला प्रशिक्षणही दिले जात आहे. मागील महिन्यात रशिया आणि बेलारूसने त्यांच्या सैनिकांना अण्वस्त्रांचा वापर करण्याचे प्राथमिक प्रशिक्षण दिले.

अमेरिकेने मागील वर्षी त्यांच्या अण्वस्त्रांसाठी ९१.४० अब्ज डॉलर खर्च केले. म्हणजे, दर सेकंदाला ते अण्वस्त्रांवर २,८९८ डॉलर खर्च करत होते. सर्व नऊ अण्वस्त्रधारी देशांनी २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये अण्वस्त्रांसाठी १०.७ अब्ज डॉलर अधिक खर्च केले आहेत. यातही ८० टक्के वाटा एकट्या अमेरिकेचा आहे.

अत्याधुनिक आणि विनाशकारी अस्त्रे तयार करण्यावर मागील पाच वर्षांमध्ये विशेष भर दिला जात आहे. हे सर्व सुरक्षेसाठी केले जात असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात यामुळेच जागतिक सुरक्षा धोक्यात असून अनेक देशांमधील सामान्य नागरिक भीतीच्या छायेत राहात आहेत, असे अभ्यासक ॲलिशिया सँडर्स-झाक्री यांनी सांगितले. जगभरात सध्या सुमारे २१०० अण्वस्त्रे तैनात अवस्थेत असून बहुतांश अण्वस्त्रे अमेरिका आणि रशियाची आहेत. चीननेही प्रथमच काही अण्वस्त्रे तैनात अवस्थेत ठेवल्याचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT