Saif-al-Adl esakal
ग्लोबल

Al Qaeda : लादेन, जवाहिरीनंतर अल-कायदाला मिळाला नवा प्रमुख; जाणून घ्या खतरनाक दहशतवादी कोण आहे?

गेल्या वर्षी अमेरिकेनं केलेल्या हवाई हल्ल्यात जवाहिरी मारला गेला होता.

सकाळ डिजिटल टीम

अदलनं दहशतवादी संघटनेची ताकद वाढवण्यास मदत केली. तसंच, 11 सप्टेंबर 2001 च्या हल्ल्यात त्यानं काही अपहरणकर्त्यांना प्रशिक्षणही दिलं होतं, असं सांगण्यात येत आहे.

ओसामा बिन लादेननंतर (Osama Bin Laden) अयमान अल-जवाहिरी (Ayman al-Zawahiri) आणि आता अल-कायदाला नवा प्रमुख मिळालाय.

जवाहिरीच्या मृत्यूनंतर इजिप्तच्या सैफ-अल-अदलला (Saif-al-Adl) दहशतवादी संघटनेची (Terrorist Organization) कमान मिळाल्याचं वृत्त आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं याबाबत माहिती दिलीये.

गेल्या वर्षी अमेरिकेनं केलेल्या हवाई हल्ल्यात जवाहिरी मारला गेला होता. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या (US Department of State) प्रवक्त्यानं सांगितलं की, 'अल कायदाचा नवा नेता सैफ अल-अदल इराणमध्ये असून यापूर्वी यूएनकडून एक अहवालही जारी करण्यात आला होता. यामध्ये अदल आता संघटनेचा नवा नेता असल्याचं म्हटलं होतं. यापूर्वी 2011 मध्ये लादेनचा पाकिस्तानमधील अबोटाबादमध्ये मृत्यू झाला होता.'

कोण आहे सैफ अल-अदल?

62 वर्षीय सैफ इजिप्शियन स्पेशल फोर्समध्ये लेफ्टनंट कर्नल होता. अदलनं दहशतवादी संघटनेची ताकद वाढवण्यास मदत केली. तसंच, 11 सप्टेंबर 2001 च्या हल्ल्यात त्यानं काही अपहरणकर्त्यांना प्रशिक्षणही दिलं होतं, असं सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अदल 2002 किंवा 2003 पासून इराणमध्ये आहे. तो अनेकवेळा पाकिस्तानातही गेला असल्याचं बोललं जात आहे. मात्र, आजतागायत संघटनेनं अधिकृतपणे अदलला प्रमुख म्हणून घोषित केलेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT