आपल्या आजुबाजूला रोज काही ना काही गोष्टी घडतात. त्यात काही गोष्टी न ऐकलेले आणि काही न पाहिलेले असतात.
आपल्या आजुबाजूला रोज काही ना काही गोष्टी घडतात. त्यात काही न ऐकलेले आणि काही न पाहिलेले असतात. अशावेळी काही गोष्टी समजल्यावर आपल्याला आश्चर्यच (Surprise)वाटते. आता हेच पाहा ना, अल्जेरियामध्ये (Algeria) एक धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. चक्क एक महिला (Women) 35 वर्षे प्रेग्नंट (Pregnant) असून तिच्या पोटामध्ये सात महिन्याचं अर्भक (Fetus) असल्याचं बोललं जात आहे. ज्याला डॉक्टरांनी स्टोन बेबी (Stone Baby) म्हटलंय. त्या महिलेच्या पोटामध्ये स्टोन बेबी सापडला आहे.
या महिलेचे वय किमान 73 आहे. तिला पोटदुखीचा (Abdominal pain) त्रास होता. यामुळे तिच्या पोटामध्ये अधूनमधून वेदना व्हायच्या. एकेदिवशी तीला खूप त्रास होत असल्यामुळे ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांच्या तपासणीनंतर समोर आले की, तिच्या गर्भात एक सात महिन्याच अर्भक होता पण त्याचं स्टोन झालं होत.
द सन च्या रिपोर्टनुसार, याआधी या महिलेनं उपचार घेण्याचा प्रयत्न केला होता. पण डॉक्टरांना याबाबत माहिती मिळाली नाही. यावेळी जेव्हा पोटात दुखायला सुरवात झाली तेव्हा या महिलेच्या पोटात गर्भ असल्याचं दिसून आलं.
यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की, या स्टोन बेबीचं वजन तब्बल 4.5 पाऊंड होतं. पण या भ्रुणामुळे कोणतेही नुकसान झालेले नाही. त्या महिलेल्या कधीकधी किरकोळ वेदना जाणवत होत्या. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जेव्हा शरीरात रक्ताची कमतरता जाणवते तेव्हा अर्भक व्यवस्थित विकसित होत नाही. ज्यामुळे शरीराकडे अर्भकाला बाहेर काढण्याचा कोणताही मार्ग नसतो. त्यानंतर हळूहळू भ्रुण दगडात बदलतो. म्हणूनच या महिलेच्या पोटात सापडलेल्या अर्भकाला स्टोन बेबी असे म्हटले आहे.
यावेळी क्लीव्हलँडच्या युनिव्हर्सिटी हॉस्पिटल केस मेडिकल सेंटरचे डॉ. किम गार्सी म्हणाले की, टिश्यू कॅल्सिफिकेशन (Tissue Calcification) आईला इतर संसर्गापासून वाचवते आणि हा स्टोन किती तरी दशकांपर्यंत पोटात राहू शकतो. बहुतेक वेळ लोक हे शोधतात आणि सापडताच हे काढून टाकत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.