elon musk 
ग्लोबल

अ‍ॅलन मस्कचा नवा अध्याय; ३०० बिलियन डॉलर कमावणारी पहिली व्यक्ती

जगातील सर्वात श्रीमंत दहा व्यक्तींच्या यादीत अव्वलस्थानी

Amit Ujagare (अमित उजागरे)

स्पेसेक्स आणि टेस्ला कंपनीचे मालक अॅलन मस्क यांनी नवा अध्याय लिहिला आहे. ३०० बिलियन डॉलरपेक्षा अधिक संपत्ती असलेले मस्क हे जगातील पहिले व्यक्ती ठरले आहेत. या संपत्तीमुळे जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीतही पहिल्या स्थानावर विराजमान झाले आहेत.

ब्लुमबर्ग मिलेनिअर इंडेक्सनुसार, अॅलन मस्क यांची एकूण संपत्ती गुरुवारी ३०२ बिलियन डॉलरवर पोहोचली आहे. गुरुवारी मस्क यांच्या संपत्तीत १० बिलियन डॉलरची भर पडली. टेस्लाच्या शेअर्सनं उसळी घेतल्यानं त्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे.

मस्क यांच्या संपत्तीचा वेगळ्या दृष्टीकोनातून विचार करायचा झाल्यास त्यांची संपत्ती ही फिनलंड, चिली, व्हिएतनाम आणि पाकिस्तान या देशांच्या वार्षिक जीडीपीपेक्षा जास्त आहे. तसेच नेटफ्लिक्स आणि पलपेच्या या त्यांच्या सहस्थापित कंपन्यांच्या बाजारमुल्याहून अधिक आहे. दरम्यान, यावर अॅलन मस्क यांनी म्हटलं की, मंगळ ग्रहावर मानवाला घेऊन जाण्यासाठी आणि तिथं नव चैतन्य निर्माण करण्यासाठी माझ्या संपत्तीचा वापर करण्याचा माझा प्लॅन आहे.

जगातील सर्वात श्रीमंत दहा व्यक्ती (ब्लुमबर्ग बिलेनिअर्सनुसार)

  1. अॅलन मस्क - ३०२ बिलियन डॉलर

  2. जेफ बोझेस - १९९ बिलियन डॉलर

  3. बर्नार्ड अरनॉर्ल्ट - १६८ बिलियन डॉलर

  4. बिल गेट्स - १३५ बिलियन डॉलर

  5. लॅरी पेज - १२९ बिलियन डॉलर

  6. सर्जरी ब्रिन - १२५ बिलियन डॉलर

  7. मार्क झुकेरबर्ग - ११८ बिलियन डॉलर

  8. स्टिव्ह बालमर - ११६ बिलियन डॉलर

  9. लॅरी एलिसन - ११५ बिलियन डॉलर

  10. वॉरन बफेट - १०५ बिलियन डॉलर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT