Elon Musk Earnings In Marathi : मेटाचे मालक मार्क झुकरबर्ग आणि ट्वीटरचे मालक इलॉन मस्क यांच्यात सुरु असेलेल्या द्वंदात मस्कने या वर्षी आतापर्यंत १०६ अब्ज डॉलर्स कमवले आहेत. ही किंमत मार्क झुकरबर्गच्या आयुष्यभराच्या कमाई एवढी आहे.
ट्वीटरला टक्कर देण्यासाठी मेटाने माइक्रो ब्लागिंग साइट थ्रेड्स अॅप लाँच केला आहे. हे भारतात लाँच केल्याबरोबर ७ तासात एक कोटी युझर्स झालेत.
ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सच्या अपडेटेड यादीत एलन मस्कचं नेवर्थ २४३ अब्ज डॉलर्स आहे. यावर्षी यांच्यावर डॉलर्सचा वर्षाव होत आहे. इलॉन मस्कची एकूण संपत्ती यावर्षी आजवर १०६ अब्ज डॉलर चा फायदा झाला आहे. तर मार्क झुकरबर्गचे नेटवर्थ १०६ अब्ज डॉलर्स आहे.
झुकर बर्ग मागच्या वर्षाच्या नुकसानातून बाहेर येत केवळ टॉप १० बिलेनियरमध्ये समाविष्ट झाले. यावर्षी आपल्या संपत्तीत ६० अब्ज डॉलर्सची भर घालत ९ व्या स्थानावर आहेत.
या लिस्टमध्ये दुसऱ्या स्थानावर १९३ अब्ज डॉलर्सची संपत्ती असणारे फ्रांसचे अब्जाधिश बर्नार्ड अर्नाल्ट आहेत. त्यांनी यावर्षी आजवर ३०.९ अब्ज डॉलर्स कमवले. जेफ बेजोस १५४ अब्ज डॉलरची संपत्तीमुळे तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांची या वर्षाची संपत्ती ४६.९ अब्ज डॉलर आहे. चौथ्या क्रमांकावर बिल गेट्स आहेत.
त्यांच्याकडे १३३ अब्ज डॉलर्सची संपत्ती असून यंदा त्यांनी २३.३ अब्ज डॉलर्स कमवले आहेत.लॅरी एलिशन पाचव्या स्थानावर आहेत. तर यंदा आतापर्यंत ३७.६ अब्ज डॉलर्स कमवले आहेत. त्यांची संपत्ती १२९ अब्ज डॉलर्स आहे.
टॉप १० मधल्या सर्वच अब्जाधिशांची संपत्ती १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. १० व्या स्थानावर असलेल्या काबिज सर्गी ब्रिनकडे १०४ अब्ज डॉलरचा नेटवर्थ आहे. त्यांच्या संपत्तीत २४.२ अब्ज डॉलरची भर पडली आहे. लॅरी पेज १०९ अब्ज डॉलर्ससह ८ व्या स्थानावर आहे.
त्यांनी यंदा संपत्तीत २६.२ अब्ज डॉलर्सची भर घातली आहे. वॉरेन बफेटच्या जवळ ११५ आणि स्टीव्ह बाल्मरकडे ११७ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. बाल्मर सहाव्या तर बफेट सातव्या स्थानावर आहे.
श्रीमंतांच्या लिस्टमध्ये रिलायंस इंडस्ट्रीजचे चेअरमन एक पायरी वर चढले आहेत. आता ते १२ व्या स्थानावर आहेत. अंबानीकडे ९०.३ अब्ज डॉलर्सची एकूण संपत्ती आहे आणि यंदा त्यांच्या नेटवर्थमध्ये ३.२२ अब्ज डॉलर्सचा नफा झाला आहे.
तर दुसरीकडे गौतम अदानी अजूनही टॉप २० च्या बाहेर २१ व्या स्थानावर आहेत. त्यांची संपत्ती ५९.२ अब्ज डॉलर्स आहे. या वर्षी आजवर त्यांनी ६१.४ अब्ज डॉलर्स गमवले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.