Elon Musk Mark Zuckerberg Cage Fight eSakal
ग्लोबल

Elon Musk mocked Zuckerberg: थ्रेडस् विरुद्ध ट्विटर, एलॉन मस्ककडून झुकरबर्गच्या नावाचा 'खेळखंडोबा'

Threads vs Twitter: थ्रेड्समुळे एलॉन मस्क आणि झुकरबर्ग या दोन अब्जाधीशांमध्ये वाद विकोपाला गेला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Elon Musk Mocked Zuckerberg: मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी ट्विटरला टक्कर देण्यासाठी थ्रेड्स नावाचा नविन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणला. मात्र, या नविन प्लॅटफॉर्मविषयी वाद वाढलाय. विशेषत: ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क हे नाराज असल्याचं समजतंय. आता मस्क यांनी या प्लॅटफॉर्मच्या निमित्ताने झुकरबर्ग यांच्या नावाचा खेळ केलायं.

काय म्हणाले एलॉन मस्क?

नुकतंच, डाटा हजार्ड नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन फास्ट फूड चेन वेंडिजच्या थ्रेड्सचा एक स्क्रिनशॉट शेअर केला होता. यामध्ये वेंडिजने एलॉन मस्क आणि ट्विटरला टोमणा मारला होता. वेंडिजने झुकरबर्ग यांना एक सल्ला दिला होता की त्यांनी मस्कला चिडवण्यासाठी अंतराळात जावं. यावर झुकरबर्गने हसणाऱ्या इमोजीने प्रतिक्रिया दिली होती.

एलॉन मस्क येणाऱ्या वर्षात आपल्या स्पेसएक्स कंपनीच्या माध्यमातून मंगळ मिशनची घोषणा करणार आहेत. अशातच, वेंडिज यांचा हा थ्रेड मस्कच्या स्पेसएक्स कंपनीला टोमणा मारताना दिसला.

ट्विटरवर थ्रेड्सच्या या स्क्रिनशॉटला एलॉन मस्क यांनी प्रतिक्रिया दिली आणि झुकरबर्गच्या नावाशी खेळ करत लिहिलं की 'झक इज कक'(Zuck is cuck)

झुकरबर्गला ट्विटरकडून कायदेशीर कारवाईची धमकी

ट्विटरने थ्रेड्स प्लॅटफॉर्ममुळे मेटाविरुद्ध कायतदेशीर कारवाईची धमकी दिली आहे, ट्विटरचे वकील एलेक्स स्परो यांनी मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना एक पत्र पाठवलं आहे. हा पूर्ण वाद कॉपीराईच्या विषयातून सुरु झालायं. ट्विटरचा दावा आहे की थ्रेड्सचा इंटरफेस ट्विटरसारखा आहे.

याशिवाय ट्विटरमध्ये असं एक फिचर आहे, ज्याला थ्रेड्स म्हटलं जातं. जेव्हा कोणतंही ट्वीट अनेक भागांमध्ये केलं जातं, तेव्हा ते थ्रेड्समध्ये विभागलं जातं. यामुळे ट्विटरने कॉपीराईटचा दावा ठोकलायं. मेटाने अद्याप याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

थ्रेड्सची लोकप्रियता वाढतेयं

मजेदार गोष्ट ही आहे की दोन अब्जाधिंशांमध्ये मेटाने थ्रेड्स लॉंच केल्यानंतर वाद दिवसेंदिवस वाढत चाललायं. थ्रेडसने नुकताच १० कोटी वापरकर्त्यांची संख्या गाठलीये आणि दिवसेंदिवस ही संख्या वाढत चाललीये.(Latest Marathi news)

तसेच, ट्विटरकडून वारंवार करण्यात येणाऱ्या बंदीच्या मागणीमुळे बऱ्याच वापरकर्त्यांना निराश केलंय. त्यामुळे ट्विटरविषयी लोकांनी नाराजी वाढत आहे.

नेमकं थ्रेड्स अ‍ॅप आहे तरी काय?

थ्रेड्स हे अ‍ॅप इंस्टाग्रामच्या एका टीमने तयार केलं आहे. थ्रेड्समध्ये देखील रिअल टाईम फीड मिळणार आहे. थ्रेड्सचे फिचर्स आणि इंटरफेस मोठ्या प्रमाणात ट्विटरसारखंच आहे. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड केल्या जाऊ शकतं. जर तुम्हाला इंस्टाग्रामवर ब्लू टीक असेल म्हणजेचं जर इंस्टाग्राम अकाऊंट व्हेरिफाईड असेल तर थ्रेड्स अकाऊंट देखील व्हेरिफाईड होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT