Elon Musk Net Worth latest news musk lost nearly 40 billion in 3 months 2024 marathi news  
ग्लोबल

Elon Musk Net Worth : तीन महिन्यात गमावले ४० बिलीयन डॉलर्स! इलॉन मस्कसोबत नेमकं काय घडलं?

Elon Musk Net Worth : टेस्लाचे सीईओ आणि एक्स (पूर्वीचे ट्विटर) मालक असलेल्या मस्क यांची नेटवर्थ आता १८९ अब्ज डॉलर आहे.

रोहित कणसे

Elon Musk Net Worth : टेस्ला या इलेक्ट्रिक कार कंपनीचे सीईओ इलॉन मस्क हे वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतात. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या मस्क यांच्या संपत्तीत लक्षणीय घट झाली आहे. २०२४ च्या सुरुवातीपासून मस्क यांनी जवळपस ४० अब्ज डॉलर्सची घसरण झाली आहे.

ब्लूमबर्ग बिलीयनीयर्स इंडेक्सनुसार, टेस्लाचे सीईओ आणि एक्स (पूर्वीचे ट्विटर) मालक असलेल्या मस्क यांची नेटवर्थ आता १८९ अब्ज डॉलर आहे. ते आता लुई व्हिटॉनचे मालक बर्नार्ड अर्नॉल्ट आणि अॅमेझॉनचे जेफ बेझोस यांच्यापाठोपाठ तिसऱ्या स्थानावर आहेत. बेझोस यांनी इलॉन मस्क यांना मागे टाकले होते, परंतु गेल्या आठवड्यात नंतर अर्नाल्ट यांनी त्यांची जागा घेतली आहे.

मस्क यांच्या संपत्तीत झालेली घट प्रामुख्याने टेस्लाच्या शेअरच्या किमतीमुळे झाली आहे, ज्यात या वर्षी जवळपास २९ टक्क्यांची घसरण झाली आहे.

बिझनेस इनसायडरच्या रिपोर्टनुसार, मस्क यांची नेटवर्थ कमी होण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या इतर घटकांमध्ये डेलावेअर कोर्टाने ५५ अब्ज डॉलर्सचे नुकसान भरपाई पॅकेज नाकारणे आणि सोशल नेटवर्क प्लॅटफॉर्म एक्स संबंधी काही अडचणी यांचा समावेश आहे.

मस्क यांनी २०२२ मध्ये ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने मस्क यांच्या अडचणी चांगल्याच वाढवल्या आहेत. वादांच्या पार्श्वभूमिवर स्वतःचे जाहिरातदार टिकवून ठेवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला आहे.

यासोबतच मस्क यांनी त्यांच्या मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट लवकरच स्मार्ट टीव्ही अॅप लॉन्च करणार असल्याची घोषणा केली आहे. अमेझॉन आणि सॅमसंग वापरकर्त्यांना लाँग फॉर्म व्हिडीओज याच्या माध्यमातून स्मार्ट टीव्हीवर पाहाता येणार आहेत. फॉर्चुन रिपोर्चनुसार हे अॅप गुगलच्या टीव्ही अॅप युट्यूबप्रमाणेच मस्क यांचे हे अॅप असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: विधानसभा निवडणुका जिंकण्याचा एकनाथ शिंदेंचा हा आहे 'मास्टर प्लॅन'; ठाण्यात नाही तर 'या' ठिकाणी ठोकणार तळ

SA vs IND: मी फार विचार केला, तर इमोशनल होईन; १० वर्ष मी वाट पाहिली! Sanju Samson ने मैदानासोबत मनंही जिंकली

शेतकऱ्यांची होणार संपूर्ण कर्जमाफी! राज्यातील साडेपंधरा लाख शेतकरी थकबाकीत; कर्जमाफीसाठी लागणार 30,495 कोटी; जाणून घ्या, जिल्हानिहाय थकबाकीदार शेतकरी

Raju Patil: ...यांच्या नियत मध्ये खोटं आहे, त्याप्रमाणे घडलं; खासदार डॉ. शिंदेंनी मैत्री न निभावल्याने मनसे आमदार पाटील दुखावले

Sakal Podcast: ‘TET’ परीक्षेवर राहणार ‘AI’ची नजर ते रश्‍दींच्या ‘द सॅटनिक व्हर्सेस’ पुस्तकावरील बंदी उठवली

SCROLL FOR NEXT