न्यूयॉर्क : ट्विटरची खरेदी केल्यानंतर अमेरिकेचे अब्जाधीश उद्योजक एलॉन मस्क हे सध्या गंमत करण्याच्या मूडमध्ये असल्याचे दिसत आहे. मस्क यांनी गुरुवारी ट्विट करीत कोकाकोला कंपनी खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करीत त्यात कोकोन मिसळणार असल्याचेही म्हटले आहे. मस्क यांच्या या खळबळजनक ट्विटनंतर ट्विटरवर कोकाकोला ट्रेन्ड सुरू झाला. मस्क यांच्या ट्विटला दोन तासांतच दहा लाख लाइक मिळाले. दोन लाख रिट्विट झाले तर ६० हजार जणांनी त्यावर मत व्यक्त केले.
मस्क यांनी हे ट्विट गमतीत केले असे मानले जात असले तरी सोशल मीडियाचे यूजर त्याबद्दल साशंक आहे. याचे कारण म्हणजे एलॉन मस्क यांनी २०१७ मध्ये ट्विटरची किंमत काय आहे, अशी विचारणा ट्विटद्वारे सहज केली होती आणि पाच वर्षांनंतर त्यांनी ट्विटरमधील १०० टक्के हिस्सा खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवत दोन दिवसांपूर्वी ट्विटर खरेदीही केले. मस्क यांनी आज ‘आता पुढे मी कोका कोला खरेदी करणार आहे. कारण त्यात मी कोकेन मिसळू शकेन,’ असे ट्विट केले आहे. ‘‘ॲटलंटा कंपनी विकत घेतली तर हे पेय तयार करण्याच्या मूळ कृतीसाठी ज्यात कोकेन मिसळले असे, त्यासाठी मी घेईल, ’’ असे स्पष्टीकरणही मस्क यांनी केले आहे.
मी चमत्कार करू शकत नाही
कोकाकोका विकत घेण्याच्या मनसुब्यानंतर मस्क यांनी आज त्यांचे जुने ट्विट टॅग करीत म्हटले आहे, की ‘ऐका, मी चमत्कार करू शकत नाही पण ट्विटरला जास्तीतजास्त मनोरंजक बनविण्याची ग्वाही देतो,’ असे म्हटले आहे. मस्क हे त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून कायम नवनवीन संकल्पना मांडत असतात. कधी हलकेफुलके ट्विटही करतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या अनेक मुद्यांवरील त्यांच्या ट्विटमुळे वादही झडत असतात.
कोकाकोलाचे साम्राज्य
मे १८८६ (अमेरिकेतील जॉर्जिया) स्थापना
जॉन पेम्बरटन संस्थापक १८८७
ॲटलंटा फार्मसिस्टच्या असा कँडलर यांनी कंपनी खरेदी केली २३० डॉलर
विक्री मूल्य २०० देश
कंपनीचे अस्तित्व ९००
जगभरातील प्रकल्प ७ लाख
कर्मचारी संख्या ८७.६ अब्ज डॉलर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.