ग्लोबल

युक्रेनमध्ये पासपोर्ट हरवलेल्या भारतीय विद्यार्थांसाठी केंद्राचा मोठा निर्णय

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचे ढग दिवसेंदिवस अधिक गडद होत आहेत.

निनाद कुलकर्णी

Russia Ukraine Crises : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचे ढग दिवसेंदिवस अधिक गडद होताना दिसत असून, युक्रेनमध्ये अद्यापही हजारो भारतीय नागरिक अडकून पडले आहेत. या सर्वांना सुखरुप भारतात परत आणण्यासाठी केंद्राकडून युद्धपातळीवर विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांचे पासपोर्ट हरवले किंवा गहाळ झाले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली आहे. ()

बागची म्हणाले की, युक्रेनमध्ये अडकलेल्या ज्या भारतीय नागरिकांचा पासपोर्ट हरवला आहे त्यांनी काळजी करण्याची गरज नाहीये. ज्यांचा पासपोर्ट हरवला आहे अशा भारतीय नागरिकांना आपत्कालीन प्रमाणपत्र देण्यासाठी यंत्रणा तयार करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. केंद्राच्या या निर्णयामुळे अनेक भारतीय विद्यार्थ्यांनाही मदत होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

युक्रेनमधून आतापर्यंत अंदाजे 17,000 भारतीय नागरिकांनी युक्रेनच्या सीमा सोडल्या आहेत असल्याचे बागची यांनी यावेळी सांगितले. तसेच युक्रेमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी आम्ही पूर्व युक्रेनमध्ये पोहोचण्याचे पर्याय शोधत असल्याचे सांगितले. गेल्या 24 तासांत 6 उड्डाणे भारतात पोहोचली असून, या विमानांमधून परतलेल्या भारतीयांची एकूण संख्या 3,352 झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jefferies Stocks: शेअर बाजार कोसळतोय; गुंतवणूक कुठे करावी? जेफरीजने सांगितले हे 14 स्टॉक खरेदी करा, होताल मालामाल

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मतदान केंद्रावरील भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

Assembly Election 2024: बीडच्या पोलिसाचा मुंबईत कारनामा! टपाली मतदानाचे फोटो गावाकडे पाठवले, गुन्हा दाखल

'मुश्रीफ ED ला घाबरून भाजपच्या पंक्तीत बसले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, निवडणुकीत त्यांना पाडा'; शरद पवारांचा हल्ला

IPL Mega Auction 2025: सातवीत शिकणाऱ्या Vaibhav Suryavanshiला डिमांड; जाणून घ्या १३ वर्षीय पोराची कमाल...

SCROLL FOR NEXT