टोकयो- जपानमध्ये ७.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. भूकंपाची तीव्रता जास्त असून त्सुनामीची पहिली लाट जपानमध्ये धडकली आहे. जपान सरकारने अलर्ट जारी केला असून नागरिकांना उंच ठिकाणांवर जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भूकंपाच्या ३०० किलोमीटर अंतरापर्यंत त्सुनामी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (First Tsunami Waves Hit Japan After 7 point 5 Quake 5 Metre Waves Expected Too)
भूकंपाची तीव्रता मोठी असल्याने चिंता वाढली आहे. माहितीनुसार, वजिमा शहरात १.२ मीटर उंचीची पहिली लाट किनाऱ्यावर धडकली आहे. येत्या काळात त्सुनामीच्या आणखी लाटा किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. दाव्यानुसार ५ मीटर उंचीच्या लाटांची शक्यता आहे. त्यामुळे किनारी भागाचे नुकसान होऊ शकते.
जपानच्या यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, जपानच्या होंशू बेटावरील नोटो भागात ५.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा पहिला भूकंप आला. त्यानंतर ७.६ तीव्रेतेचा दुसरा भूकंप झाला. त्यानंतर आणखी काही भूकंप सातत्याने झाल्याचे सांगितले जाताहेत. ७.६ तीव्रतेच्या भूकंपानंतर प्रशासन हाय अलर्ट मोडवर गेले आहे. नागरिकांशी संपर्क साधून त्यांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगण्यात आलं आहे.
एनएचकेनुसार, जपानचा पश्चिमी किनारा आणि अन्य भागात तीन मीटरपर्यंत उंचीच्या लाटा येऊ शकतात. जपानमध्ये भूकंप येण्याच्या घटना या काही नवीन नाहीत. मात्र, कितीही काळजी घेतली तरी काही प्रमाणात का होईना नुकसान होतेच. काही वर्षांमध्ये त्सुनामीमुळे जपानच्या अणुभट्टीचे नुकसान झाले होते. त्यामुळे मोठे संकट ओढवले होते. त्यामुळे यावेळी सतर्कता घेतली जात आहे. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.