Flights Shutdown in US : संपूर्ण अमेरिकेतील विमानसेवा ठप्प झाल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
हे ही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?
दरम्यान, फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या संगणकात बिघाड झाल्यामुळे संपूर्ण युनायटेड स्टेट्समधील उड्डाणे प्रभावित झाल्याचे, यूएस मीडियाने म्हटले आहे.
फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट FlightAware ने यूएस ईस्टर्न वेळेनुसार सकाळी 6:30 वाजेपर्यंत युनायटेड स्टेट्ससह बाहेरील 1200 हून अधिक फ्लाइट्स उशीर झाल्याची माहिती दिली आहे.
दरम्यान, FAA एअर मिशन सिस्टम पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे. या बिघाडामुळे नॅशनल एअरस्पेस सिस्टीममधील कामकाज प्रभावित झाले आहे.
काय आहे नोटिस टू एयर मिशन सिस्टम?
यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनची (FAA) नोटीस टू एअर मिशन सिस्टम वैमानिक आणि इतर उड्डाण कर्मचार्यांना धोक्यांबद्दल किंवा विमानतळ सुविधा सेवांमधील कोणत्याही बदलांबद्दल सतर्क करते. याद्वारे, सामान्य प्रक्रियादेखील अद्यतनित केल्या जातात.
दरम्यान, आज याद्वारे कोणतीही माहिती शेअर केली जात नव्हती. त्यामुळे संपूर्ण अमेरिकेत विमानसेवा ठप्प झाली आहे.अनेक विमानं जमीनीवर असून, हजारो विमानं विमानतळांवर लँडिंगसाठी हवेतच फिरत आहेत. सिस्टममधील बिघाडामुळे 1200 हून अधिक उड्डाणे प्रभावित झाली असून, आतापर्यंत जवळपास 93 उड्डाणे रद्द करावी लागली आहेत.
भारतावर काय झाला परिणाम
अमेरिकेतील विमानसेवा ठप्प झाल्यानंतर DGCA कडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. DGCA च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भारतातील सर्व विमानतळांवर कामकाज सामान्य आहे. यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या बिघाडाचा भारतातून अमेरिकेला जाणाऱ्या फ्लाइटवर कोणताही परिणाम झालेला नसल्याचे DGCA ने स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.