Vegetables  Sakal
ग्लोबल

श्रीलंकेत महागाईचा उद्रेक! हिरवी मिर्ची 700, तर बटाटे 200 रुपये किलो

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना पोटभर अन्नही मिळत नाहीये.

निनाद कुलकर्णी

भारताचा शेजारी देश श्रीलंका (Sri Lanka) दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असून, येथील खाद्यपदार्थांच्या (Vegetables Price High In Sri Lanka ) किमती गगनाला भिडल्या आहेत. दरम्यान, श्रीलंकेच्या अॅडव्होकाटा इन्स्टिट्यूटने चलनवाढीचा डेटा जारी केला आहे, ज्यामध्ये एका महिन्यात खाद्यपदार्थांच्या किमती 15 टक्क्यांनी वाढल्याचं सांगण्यात आलं आहे. या वाढीचे सर्वात मोठे कारण म्हणजे भाज्यांच्या दरात झालेली प्रचंड वाढ असल्याचे सांगितले जात आहे. अॅडव्होकाटा इन्स्टिट्यूटचा बाथ करी इंडिकेटर (BCI) देशातील किरकोळ वस्तूंच्या चलनवाढीचा डेटा प्रसिद्ध करते. नोव्हेंबर 2021 ते डिसेंबर 2021 दरम्यान खाद्यपदार्थांच्या महागाईत (Inflation) 15 टक्क्यांनी वाढ झाल्याचा अहवाल BCI ने दिला आहे. (Sri Lanka Advocata Institute Released Data On Inflation)

देशात आर्थिक आणीबाणी लागू

वाढत्या महागाईमुळे (Inflation) सर्वसामान्य जनता हैराण झाली असून लोकांना पोटभर अन्नही मिळत नाहीये. अन्नधान्याच्या वाढत्या किमती पाहता राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देशात आर्थिक आणीबाणी (Economic Emergency) लागू केली आहे. या अंतर्गत सर्वसामान्यांना सरकारने ठरवून दिलेल्या किमतीतच खाण्यापिण्याची सुविधा मिळावी यासाठी लष्कराला अधिकार देण्यात आले आहेत. जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, कोविडच्या सुरुवातीपासून श्रीलंकेतील पाच लाख लोक दारिद्र्यरेषेखाली गेले आहेत. डिसेंबरमध्ये खाद्यपदार्थ 22.1 टक्क्यांनी महागले आहेत. (President Gotabaya Rajapaksa Imposed Economic Emergency)

श्रीलंकेत 100 ग्रॅम मिरचीची (Green Chilies) किंमत 18 रुपये होती, ती आता 71 रुपये झाली आहे. म्हणजेच एक किलो मिरचीचा भाव 710 रुपयांवर गेला आहे. मिरचीच्या भावात एकाच महिन्यात 287 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे वांग्याच्या दरात 51 टक्के, लाल कांद्यामध्ये 40 टक्के आणि सोयाबीन, टोमॅटोच्या दरात 10 टक्के वाढ झाली आहे. एका किलो बटाट्यासाठी लोकांना 200 रुपये मोजावे लागत आहेत. तर, आयात न झाल्यामुळे दुधाच्या भुकटीचाही तुटवडा निर्माण झाला आहे. याशिवाय येथे टोमॅटो - 200 रु./किलो, वांगी - रु 160/किलो, भेंडी - रु 200/किलो, कार्ले - रु 160/किलो, बीन्स- 320 रुपये/किलो, कोबी - 240 रुपये/किलो, गाजर - रु 200/किलो, कच्ची केळी - रु 120/किलोने विकले जात आहेत. (Economic Emergency In Sri Lanka)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आशिष शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT