Bangladesh  sakal
ग्लोबल

Bangladesh : बांगलादेशातील पुराला जबाबदार नाही ; भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण, परस्पर सहकार्याची गरज

राजकीय अस्थिरतेचा सामना करणाऱ्या बांगलादेशमध्ये पुराने थैमान घातले आहे. या पूरसंकटासाठी तेथील उपद्रवी घटकांकडून भारतावर खापर फोडणे सुरू झाले आहे. त्यापार्श्वभूमीवर, परराष्ट्र मंत्रालयाने या पूर परिस्थितीसाठी भारत जबाबदार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : राजकीय अस्थिरतेचा सामना करणाऱ्या बांगलादेशमध्ये पुराने थैमान घातले आहे. या पूरसंकटासाठी तेथील उपद्रवी घटकांकडून भारतावर खापर फोडणे सुरू झाले आहे. त्यापार्श्वभूमीवर, परराष्ट्र मंत्रालयाने या पूर परिस्थितीसाठी भारत जबाबदार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

बांगलादेशच्या पूर्व सीमेवरील जिल्ह्यांमधील सध्याची पूरस्थिती त्रिपुरातील गोमती नदीवरील डांबूर धरणाचे दरवाजे उघडल्याने उद्भवलेली नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

डांबूर धरणातील विसर्गामुळे पूर आल्याचे आरोप निराधार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात निवेदन जारी करून स्पष्ट केले. भारत आणि बांगलादेशमध्ये वाहणाऱ्या गोमती नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांत सर्वांत जास्त पाऊस झाला आहे. बांगलादेशातील पूर मुख्यत्वे धरणाखालील पाणलोट क्षेत्रांत झालेल्या पावसामुळे आला आहे. त्रिपुरातील डांबूर धरण बांगलादेश सीमेपासून १२० किलोमीटर लांब आहे.

या ३० मीटर उंचीच्या धरणावर जलविद्युत निर्मिती प्रकल्प देखील आहे. संपूर्ण त्रिपुरा आणि बांगलादेशच्या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये २१ ऑगस्टपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक भागांत पाणी साचले आहे. या परिस्थितीचा तपशील काल बांगलादेश सरकारकडे देखील पाठविला आहे.

मात्र, तेव्हापासून वीजपुरवठा खंडित झाल्याने तपशील कळविण्यात अहवाल पाठवण्यात अडचणी येत आहेत. दोन्ही देशांमध्ये वाहणाऱ्या नद्यांना पूर येणे ही एक सामान्य समस्या आहे, ज्यामुळे दोन्ही बाजूंच्या लोकांना समस्या निर्माण होतात आणि ते सोडवण्यासाठी परस्पर सहकार्याची गरज आहे. दोन्ही देशांमध्ये जवळपास ५४ नद्या आहेत, नदी जल सहकार्य हा आमच्या द्वीपक्षीय सहभागाचा महत्त्वाचा भाग असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Parkash Ambedkar : सत्तेत सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका, ते म्हणाले...

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Latest Maharashtra News Updates : जम्मूमध्ये अतिक्रमणविरोधी मोहीम

SCROLL FOR NEXT