अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. कॅपिटल हिंसाचार प्रकरणात दोषी मानत कोर्टाने त्यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी अपात्र घोषित केलं आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवता येणार नाही. याशिवाय निवडणुकीत मतदान देखील करता येणार नाही. अमेरिकेच्या कोलोरॅडो हायकोर्टाने मंगळवारी हा निर्णय दिला आहे. त्याचबरोबर . रिपब्लिकन अध्यक्षीय प्राथमिक मतपत्रिकेतून त्यांचे नाव वगळण्याचे आदेशही न्यायालयाने राज्य सचिवांना दिले आहेत.
6 जानेवारी 2021 रोजी कॅपिटल येथे दंगल भडकावल्यामुळे ट्रम्प यांना 2024 च्या निवडणुकीसाठी राज्य मतपत्रिकेत समाविष्ट करण्यापासून रोखण्यात आले होते, परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा निर्णय 4 जानेवारीपर्यंत लागू होण्यापासून रोखले. यामुळे ट्रम्प न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात अपील करू शकतात.
त्याचबरोबर अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार ट्रम्प यांना अध्यक्षपदासाठी अपात्र घोषित करण्यात आलं आहे. कोर्टाने व्हाईट हाऊसच्या निवडणूक शर्यतीतील प्राथमिक अध्यक्षीय मतपत्रिकेतून ट्रम्प यांचं नाव काढून टाकलं आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच १४ व्या घटनादुरुस्तीच्या कलम ३ चा वापर राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला अपात्र ठरवण्यासाठी केला गेला आहे.
न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, बहुसंख्य न्यायालयाचा असा विश्वास आहे की, 14 व्या घटनादुरुस्तीच्या कलम 3 अंतर्गत ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदासाठी अपात्र आहेत.
6 जानेवारी 2021 रोजी यूएस कॅपिटल हिलवर त्यांच्या समर्थकांनी केलेल्या हल्ल्यात त्यांच्या भूमिकेमुळे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील वर्षीच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोलोरॅडोमध्ये मतदान करू शकत नाहीत, राज्याच्या सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
कोलोरॅडोच्या सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयाचा निर्णय रद्द केला आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, कॅपिटल हिलवर 6 जानेवारी 2021 रोजी झालेल्या हल्ल्यात ट्रम्प यांनी त्यांच्या भूमिकेसाठी बंडखोरी केली होती, परंतु त्यांना मतदान करण्यापासून रोखले जाऊ शकत नाही कारण ही तरतूद अध्यक्षपदाचा अंतर्भाव करण्याच्या हेतूने होती हे स्पष्ट नव्हते.
काय आहे संपुर्ण प्रकरण?
६ जानेवारी २०२१ मध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा पराभव झाला. डेमोक्रॅटिक पक्षाच्या जो बायडन यांनी ट्रम्प यांना तब्बल ७० लाखांहून अधिक इलेट्रोल मतांनी हरवलं. मात्र, निवडणुकीत घोटाळा झाला, असं म्हणत ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
याविरोधात त्यांनी अमेरिकेतील कोर्टात धाव घेतली. पण, कोर्टानेही ही निवडणूक योग्य असून जो बायडन विजेते असल्याचं सांगितलं होतं. एवढं होऊनही ट्रम्प यांनी पराभव मान्य केला नाही. त्यानंतरही ते ट्विटरवरुन सतत आपली मतं मांडत राहिले.
यानंतर ट्रम्प समर्थक आक्रमक होत अमेरिकेच्या कॅपिटल भवनाबाहेर गर्दी करत घोषणाबाजी केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. यावेळी झालेल्या हिंसाचारात ४ ते ५ जणांचा मृत्यू झाला. तर याशिवाय अनेकजण जखमी झाले होते.
दरम्यान,आंदोलकांना चिथावणी देण्याचा ठपका ठेवत ट्रंप यांच्यावर महाभियोगाचा खटला दाखल करण्यात आला होता. मात्र, ट्रम्प यांच्या विरोधात दोन तृतीयांश मते न पडल्याने त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. आता कोलोरॅडो हायकोर्टाने याप्रकरणात त्यांना दोषी मानत निवडणूक लढवण्यावर बंदी घातली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.