श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे शुक्रवारी थायलंडहून मायदेशी परतले आहेत. याआधी शनिवारी सकाळी ते श्रीलंकेला परतल्याची बातमी आली होती. आर्थिक संकटातून जात असलेल्या श्रीलंकेत दोन महिन्यांपूर्वी गोटाबाया यांच्या सरकारविरोधातील निदर्शने तीव्र झाल्यानंतर 73 वर्षीय राजपक्षे यांनी 13 जुलै रोजी देश सोडून पळ काढला होता. श्रीलंका इतिहासातील सर्वात भीषण आर्थिक संकटाचा सध्या सामना करत आहे. खाद्यपदार्थांपासून ते इंधनापर्यंत सर्वच गोष्टींचा तुटवडा निर्माण झाला असून जनतेला त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गोटाबाया सिंगापूर एअरलाइन्सच्या विमानाने श्रीलंकेला परतले होते. 9 जुलै रोजी निदर्शक कोलंबोतील राष्ट्रपती भवनात घुसले. इतर अनेक सरकारी इमारतींवरही आंदोलकांनी ताबा मिळवला होता. यानंतर गोटाबाया श्रीलंकेच्या हवाई दलाच्या विमानाने मालदीवला पळून गेले आणि तेथून सिंगापूरला गेले. तेथून त्यांनी 14 जुलै रोजी राजीनामा पाठवला, त्यानंतर ते थायलंडला गेले जेथे त्यांनी तात्पुरता आश्रय घेतला होता.
गोटाबाया राजपक्षे श्रीलंकेत परतण्यापूर्वी ते शुक्रवारी किंवा शनिवारी परततील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. यासोबतच त्याच्या परतीच्या वृत्ताला थायलंडच्या मीडियानेही दुजोरा दिला आहे. गोटाबाया जुलैमध्ये देश सोडून प्रथम मालदीवमध्ये पळून गेले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.