Emmanuel Macron France Election 2024 Esakal
ग्लोबल

France Election 2024: फ्रेंच निवडणुकीत त्रिशंकू संसदेची शक्यता, एक्झिट पोलमध्ये डावी आघाडी वरचढ

Emmanuel Macron: फ्रेंच संसदेचा कार्यकाळ 2027 मध्ये संपणार होता, परंतु 9 जून रोजी युरोपियन युनियनमध्ये त्यांच्या रेन्सा पक्षाचा मोठा पराभव झाल्यानंतर अध्यक्ष मॅक्रॉन यांनी संसद अकाली विसर्जित करून मोठी जोखीम पत्करली आहे.

आशुतोष मसगौंडे

फ्रान्स त्रिशंकू संसदेकडे वाटचाल करताना दिसत आहे. रविवारी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतरच्या एक्झिट पोलमध्ये कोणत्याही आघाडीला बहुमत मिळताना दिसत नाही. उजव्या आघाडीला मागे टाकून डाव्या आघाडीला अनपेक्षितपणे फायदा होताना दिसत आहे.

अधिकृत निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत, परंतु एक्झिट पोलनुसार डाव्या आघाडीला 577 पैकी 172 ते 215 जागा मिळण्याची शक्यता आहे.

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या आघाडीला 150-180 जागा मिळू शकतात. मरीन ले पेन यांचा नॅशनल रॅली हा पक्ष विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात होता, मात्र त्याला केवळ 115 ते 155 जागा मिळताना दिसत आहेत.

नॅशनल रॅली पक्षाचे अध्यक्ष जॉर्डन बार्डेला यांनी मॅक्रॉन यांच्यावर 'अनिश्चितता आणि अस्थिरता' निर्माण केल्याचा आरोप केला. तसेच फ्रान्स हा डाव्यांच्या हातात गेला आहे, असे म्हटले आहे.

दरम्यान, फ्रान्सचे डावे नेते राफेल ग्लक्समन यांनी सांगितले की, ज्या संसदेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही अशा संसदेत संवादासाठी खुलेपणा आवश्यक आहे. डावे नेते जीन-ल्यूक मेलेंचॉन यांनी मॅक्रॉनला सरकार स्थापन करण्यासाठी डाव्या नवीन पॉप्युलर फ्रंट युतीला आमंत्रित करण्याची विनंती केली आहे.

त्याचवेळी, मॅक्रॉन यांच्या कार्यालयाने सांगितले की, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अध्यक्ष नवीन नॅशनल असेंब्लीच्या स्थापनेपर्यंत प्रतीक्षा करतील. मॅक्रॉन आणि त्यांच्या सत्ताधारी आघाडीला महागाई, इमिग्रेशन आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर मतदारांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे.

फ्रान्सच्या राज्यघटनेनुसार एका वर्षात दोनदा संसदीय निवडणुका होऊ शकत नाहीत, त्यामुळे कोणत्याही युतीला बहुमत मिळाले नाही तर एक वर्ष अस्थिरतेची परिस्थिती निर्माण होईल.

निवडणुका संपल्यानंतर मतमोजणी सुरू आहे. निवडणुकीचे निकाल सोमवारी म्हणजेच आज येण्याची शक्यता आहे.

फ्रेंच संसदेचा कार्यकाळ 2027 मध्ये संपणार होता, परंतु 9 जून रोजी युरोपियन युनियनमध्ये त्यांच्या रेन्सा पक्षाचा मोठा पराभव झाल्यानंतर अध्यक्ष मॅक्रॉन यांनी संसद अकाली विसर्जित करून मोठी जोखीम पत्करली आहे.

त्रिशंकू संसद?

निवडणुकीतून तीन मोठे राजकीय गट उदयास आले असले तरी त्यापैकी एकही 577 पैकी किमान 289 जागांच्या बहुमताच्या जवळ नाही.

फ्रान्सच्या संसदेच्या दोन सभागृहांपैकी नॅशनल असेंब्ली ही सर्वात महत्त्वाची आहे. कॉन्झर्वेटीव्ह पक्षाचे वर्चस्व असलेल्या सिनेटवर कायदा बनविण्याच्या प्रक्रियेत त्याची भूमिका महत्त्वाची असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT