frank kameny frank kameny
ग्लोबल

Google Doodle: अमेरिकन सरकारने का मागितली होती कामेनी यांची माफी?

गुगलने फ्रँक कामेनी यांना अमेरिकेतील एलजीबीटीक्यू (LGBTQ) यांच्या अधिकारासाठी झालेल्या आंदोलनातील प्रमुख म्हणून गौरवले आहे

प्रमोद सरवळे

नवी दिल्ली: Google ने आज अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ आणि दुसऱ्या महायुद्धात मोलाची भूमिका बजावणारे तसेच समलिंगी नागरिकांच्या हक्कासाठी काम करणारे कार्यकर्ते फ्रँक कामेनी (Frank Kameny) यांचे खास डूडल (google doodle) ठेऊन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. गुगलने होमपेजवर एक डूडल तयार केले आहे त्यात कामेनी यांना रंगीत हार घातल्याचे दिसत आहे.

गुगलने फ्रँक कामेनी यांना अमेरिकेतील एलजीबीटीक्यू (LGBTQ) यांच्या अधिकारासाठी झालेल्या आंदोलनातील प्रमुख म्हणून गौरवले आहे. तसेच या डूडलमध्ये frank kameny यांनी मागील अनेक दशकांत अमेरिकेला प्रगतीच्या वाटचालीचा मार्ग दाखवल्याने त्यांचे धन्यवाद दिले आहेत.

frank kameny

लष्करातून झाली होती हाकालपट्टी-

कामेनी यांचा जन्म २१ मे १९२५मध्ये न्यूयॉर्कमध्ये झाला होता. भौतिकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी कामेनी यांनी वयाच्या १५ व्या वर्षी क्वीन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. तसेच त्यांना प्रसिद्ध हॉर्वर्ड विश्वविद्यालयातून खगोलशास्त्रात डॉक्टरेट मिळाल्यानंतर कामेनी यांनी दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला होता. नंतर काही काळ त्यांनी आर्मीमध्ये तज्ज्ञ म्हणूनही काम केले.

समलैंगिकांसाठी पहिली याचिका-

काही काळानंतर LGBTQ लोकांच्या अधिकारांचे समर्थन आणि त्यांची पाठराखण केल्यामुळे त्यांना आर्मीतील नोकरी गमवावी लागली होती. नंतर कामेनी यांनी अमेरिकन सरकारवर न्यायालयीन खटला दाखल केला होता. तसेच १९६१ साली अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टात पहिली समलैंगिक अधिकार याचिका दाखल केली होती.

अमेरिकन सरकारने मागितली होती माफी-

आर्मीमधील नोकरीतून हाकालपट्टी केल्यामुळे तब्बल ५० वर्षानंतर २००९ मध्ये अमेरिकन सरकारने फ्रँक कामेनी यांची अधिकृत माफी मागितली होती. तसेच वॉशिंग्टन डीसीमधील एका रस्त्यालाही त्यांचे नाव देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT