बर्लिन - हिवाळ्याबरोबरच कोरोनाची दुसरी लाट आली असताना युरोपमध्ये स्की रिसॉर्ट बंद करावेत अशी भूमिका जर्मनीने घेतली आहे. ऑस्ट्रिया या शेजारी देशाबरोबरील करार मात्र अवघड ठरला असल्याचे जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी सांगितले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
मर्केल यांनी संसदेत निवेदन केले. त्या म्हणाल्या की, स्की मोसम जवळ आला आहे. सर्व स्की रिसॉर्ट बंद ठेवता यावीत म्हणून आम्ही युरोपमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करू. ऑस्ट्रीयाबाबत पुन्हा प्रयत्न केले जातील.
पहिल्या लाटेत जर्मनीत आढळलेले अनेक रुग्ण इश्कल या ऑस्ट्रीयातील स्की रिसॉर्टशी संबंधित होते. यामुळे ऑस्ट्रीया, इटली, स्वित्झर्लंड येथील लोकप्रिय स्की विभागांत प्रवास करू नये असा इशाराच जर्मनीने जारी केला.
महत्त्वाचे मुद्दे
इटलीच्या पंतप्रधानांचा इशारा
नाताळच्या सुटीत लोकांनी स्कीईंग करू नये. त्यामुळे दुसरी लाट रोखता येईल, असे इटलीचे पंतप्रधान ज्युसेप्पे काँटे यांनी नुकतेच सांगितले. युरोपने सामायिक नियमांना सहमती दर्शवावी. इटलीने आपले स्की क्षेत्र बंद ठेवले तर परदेशांतून रुग्ण येण्यास प्रतिबंध होईल, असेही ते म्हणाले.
युरोपीय महासंघाने स्कीईंग क्षेत्र बंद ठेवले तर दोन अब्ज युरो नुकसान होईल, ज्याची महासंघाने भरपाई द्यायला हवी.
- जेर्नोट ब्लुमेल, ऑस्ट्रियाचे अर्थ मंत्री
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.