Giorgia Meloni esakal
ग्लोबल

Giorgia Meloni : नमस्काराने स्वागत करणाऱ्या जॉर्जिया मेलोनींना मिळतो लाखो रूपये पगार, किती श्रीमंत आहेत PM ?

मेलोनी वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी खासदार झाल्या. 2006 मध्ये त्या संसदेत पोहोचल्या

सकाळ डिजिटल टीम

Giorgia Meloni :

सध्या ग्लोबल लेव्हलला एका कार्यक्रमाची जोरदार चर्चा आहे. तो म्हणजे इटलीमध्ये सुरू असलेला G-7 शिखर परिषद होय. या समिटसाठी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया यांनी विशेष मेहनत केली आहे. इटलीच्या पंतप्रधान असलेल्या जॉर्जिया यांनी जीवनात खडतर प्रवास केला आहे.

जॉर्जिया मेलोनी एक इटालियन नेत्या आहे. वयाच्या 50 पेक्षा कमी वयात त्यांनी इटलीची सत्ता हाती घेतली. त्यांचे वैयक्तिक जीवनातील प्रवास खडतर होता तरी त्याची झळ त्यांनी कधी राजकारणातील नेतृत्वाला बसू दिली नाही. जॉर्जिया युरोपमधील सर्वात अनुभवी राजकारण्यांपैकी एक आहेत.

2022 च्या निवडणुकीत त्यांचा इटलीतील ब्रदर्स पक्ष प्रथमच विजयी झाला. निवडणुकीनंतर मेलोनी पंतप्रधान झाल्या. चला तर मग जाणून घेऊया मेलोनी किती श्रीमंत आहेत?

इटालियन खासदारांना टेलिफोनसाठी प्रति वर्ष 1,200 युरो (रु. 1.07 लाख) आणि दर तीन महिन्यांनी 3,323-3,995 युरो (2.97-3.57 लाख रुपये) देण्याचा नियम आहे. मात्र, मेलोनी यांच्या पक्षाचे खासदार त्यांच्या पगारातील काही हिस्सा पक्षाच्या तिजोरीत जमा करतात.

ते खरंच काही भाग पक्षासाठी देतात का, यासाठी चेंबर ऑफ डेप्युटीजच्या संकेतस्थळावर सर्व प्रतिनिधींचे विविध कर विवरणपत्रे काही काळ प्रसिद्ध करण्यात आली आहेत. मेलोनीही याला अपवाद नाहीत. त्याही त्यांचा हिस्सा पक्षासाठी देतात.

2023 ची आकडेवारी

मेलोनी वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी खासदार झाल्या. 2006 मध्ये त्या संसदेत पोहोचल्या. वयाच्या 29 व्या वर्षी खासदार झाल्यानंतर मेलोनीने आणखी एक इतिहास रचला आणि अवघ्या दोन वर्षांनंतर वयाच्या 28 व्या वर्षी त्या इटलीतील सर्वात तरुण मंत्री बनल्या. बर्लुस्कोनी यांच्या चौथ्या सरकारमध्ये त्यांना युवा व्यवहार मंत्री करण्यात आले.

यानुसार, इटालियन विधानसभेनुसार, एका खासदाराचा पगार 11,703 युरो (10.47 लाख रुपये) आहे. करानंतर त्याला 5,346.54 युरो (4.78 लाख रुपये) मिळतात. 3721 युरो (रु.3.33 लाख) दैनिक भत्ता आणि 3690 युरो (3.30 लाख रुपये) दिले जातात.

2023 ची आकडेवारी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचे पूर्ण उत्पन्न दर्शवत नाही, कारण ते 2022 शी संबंधित होते. पण तत्कालीन आकडेवारीनुसार मेलोनीचे उत्पन्न 293,531 युरो (2.62 कोटी रुपये) आहे.

या व्यतिरिक्त मेलोनी यांच्याकडे काय आहे?

2021 पासून मेलोनी यांच्या उत्पन्नात ही वाढ झाली आहे. 2020 मध्ये कोरोनाच्या काळात त्यांचे उत्पन्न 134,206 युरो (1.2 कोटी रुपये) होते. 2017-18 मध्ये जॉर्जिया मेलोनीचे सर्वात कमी उत्पन्न होते. तेव्हा त्यांचे वार्षिक उत्पन्न 98,471 युरो (88.13 लाख रुपये) होते.

2018 मध्ये त्याने रोममधील दोन रिअल इस्टेट मालमत्ता, एक कार आणि 20,000 युरो पार्टीचे योगदान दिले आहे. अहवालानुसार, जॉर्जिया मेलोनीची 2006 पासूनची सर्व कमाई जोडल्यानंतर एकूण संपत्ती 16 लाख युरो (14.31 कोटी रुपये) आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT