Global Hunger Index esakal
ग्लोबल

चिंताजनक! भारतात उपासमारी वाढली; नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तानची स्थिती चांगली

सकाळ डिजिटल टीम

ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारतातील उपासमारीची पातळी 'चिंताजनक' असल्याचे अहवालात नमूद करण्यात आलंय.

Global Hunger Index 2021 : अन्नटंचाई, उपासमारीबाबत नुकताच एक अहवाल समोर आलाय. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये (Global Hunger Index 2021) भारताचं नाव अत्यंत खालच्या क्रमांकावर गेलंय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, उपासमारीच्या बाबतीत भारताशी तुलना केल्यास पाकिस्तान, नेपाळसारखे देश खूप चांगल्या अवस्थेमध्ये दिसताहेत. 116 देशांच्या या यादीमध्ये भारत 101 व्या स्थानावर घसरलाय. याबाबतीत तो त्याचे शेजारील देश पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळच्याही मागे आहे. 2020 मध्ये भारत 94 व्या क्रमांकावर होता. त्यामुळे हा अहवाल भारतासाठी चिंतेचा विषय बनलाय.

ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारतातील उपासमारीची पातळी 'चिंताजनक' असल्याचे अहवालात नमूद करण्यात आलंय. अहवालानुसार नेपाळ (76), बांगलादेश (76), म्यानमार (71) आणि पाकिस्तान (92) हे भारताच्या पुढे आहेत. या सर्व देशांनी आपल्या नागरिकांना अन्न पुरवण्यात भारतापेक्षा चांगली कामगिरी केलीय. या सूचीमध्ये पाचपेक्षा कमी GHI स्कोअरसह चीन, ब्राझील आणि कुवैतसह 18 देश आघाडीवर आहेत. तर भारतानंतर पापुआ न्यू गिनी (102), अफगाणिस्तान (103), नायजेरिया (103), कांगो (105), मोझाम्बिक (106), सिएरा लिओन (106), तिमोर-लेस्ते (108), हैती (109), लाइबेरिया (110), मादागास्कर (111), डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो (112), चाड (113), सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक (114), येमेन (115) आणि सोमालिया या देशांची स्थिती अत्यंत खराब असल्याचे अहवालात म्हटलंय.

भारताचा GHI स्कोअर देखील घसरला असून सन 2000 मध्ये तो 38.8 होता, तर 2012 ते 2021 दरम्यान 28.8 - 27.5 असा राहिलाय. जीएचआय स्कोअरची गणना चार निर्देशकांवर केली जाते. ज्यात कुपोषण, बाल वाढीचा दर आणि बाल मृत्यू दर यांचा समावेश आहे. अहवालानुसार, नेपाळ (76), बांगलादेश (76), म्यानमार (71) आणि पाकिस्तान (92) हे भारताच्या पुढे आहेत. या सर्व देशांनी आपल्या नागरिकांना अन्न पुरवण्यात भारतापेक्षा चांगली कामगिरी केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT