Global Hunger Index  Esakal
ग्लोबल

Pakistan Hunger Index: पाकिस्तानात नागरिकांचे उपासमारीनं हाल! ग्लोबल हंगर इंडेक्समुळं बिकट स्थिती उघड

Global Hunger Index:पाकिस्तानची अवस्था दिवसेंदिवस कमकुवत , ग्लोबल हंगर इंडेक्समुळे देशातील उपासमार जगजाहीर

सकाळ डिजिटल टीम

Global Hunger Index: भारताचा शेजारी देश सध्या गंभीर उपासमारीच्या विळख्यात अडकला आहे. पाकिस्तान देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात गंभीर संकट घोंघावतंय. नुसत्यात प्रकाशित झालेल्या ग्लोबल हंगर इंडेक्सच्या माध्यमातून ही गोष्ट समोर आली.

अहवालानुसार, ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये पाकिस्तानचा स्कोर २००६मध्ये ३८.१वरुन घसरुन २०२३मध्ये २६.१ इतका झाला. ज्यावरुन समजतं की पाकिस्तान देशावर आणि देशाच्या जनतेवर किती मोठं संकट कोसळलंय. ग्लोबल हंगर इंडेक्सची ही आकडेवारी मंगळवारी जाहीर करण्यात आली.

ग्लोबल हंगर इंडेक्सने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पाकिस्तान उपासमारीविरुद्ध आपल्या लढाईत एक मोठ्या आव्हानाचा सामना करतोय. पाकिस्तान दहशतवाद, सशस्त्र संघर्ष, कोरोना संकटांबरोबरच आर्थिक संकटातही सापडलाय. (Latest Marathi News)

१२९ देशांचा अभ्यास करत, जीएचआय इंडेक्समधून माहिती मिळतीये की २०२१मध्ये जवळपास ८२ लाख उपासमारीचा सामना करत होते. वेगवेगळी संकट एकमेकांशी निगडीत आहेत. हा अहवाल जगभरातील पोषण संकट दूर करण्यासाठी आणि पाकिस्तानसहित जगभरातील देश जे खाद्य असुरक्षितताग्रस्त आहेत,त्यांची दुर्दशा कमी करण्याचा प्रयत्न करतो.

ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये एकून १२१ देशांचं सर्वेक्षण केलं जातं, ज्यामध्ये पाकिस्तान ९९व्या स्थानावर आहे.

या अहवालानुसार, ग्लोबल हंगर इंडेक्सने म्हटलंय की सशस्त्र संघर्ष, जलवायू परिवर्तन आणि कोरोनाच्या वैश्विक संकटामुळे ८२.८ लाख लोकांना उपाशी राहावं लागलं. जीएपआयने आपल्या विधानात म्हटलंय की,"आता जशी परिस्थिती आहे, त्यानुसार ४६ देश उपासमारी कमी करण्याच्या सगळ्यात शेवटच्या टप्प्यापर्यंत देखील पोहोचू शकतं नाही, पूर्णपणे उपासमारीचे उच्चाटन करणं तर लांबचं राहिलं.(Latest Marathi News)

आफ्रिकेमधील दक्षिण सहारा भाग आणि दक्षिण आशिया भागात उपासमारी मोठ्या प्रमाणात आहे. या भागात लहान मुलांचा विकसित होण्याचा दर फार कमी आहे आणि आतापर्यंत जगातील कोणत्याही भागाच्या तुलनेत मुलं अशक्त होण्याचा दर या भागात जास्त आहे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT