Geoffrey Hinton sakal
ग्लोबल

Global News : AI चे जनक हिंटन गुगलमधून पायउतार

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक मानले जाणारे जेफ्री हिंटन यांनी गुगलचा राजीनामा दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक मानले जाणारे जेफ्री हिंटन यांनी गुगलचा राजीनामा दिला आहे. गुगल सोडणार असल्याचे त्यांनी केले. जे तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम केले, त्याच्या धोक्यांबद्दल बोलण्यासाठी मी गेल्या महिन्यातच राजीनामा दिला असल्याचे हिंटन यांनी सांगितले. याबाबतचे वृत्त अमेरिकेच्या माध्यमांनी सोमवारी (ता.१) दिले.

‘एआय’ प्रणालीसाठी मूलभूत तंत्रज्ञानाची निर्मिती हिंटन यांनी केली आहे. ‘एआय’आधारित अनेक उत्पादने विकसित करण्यात हिंटन यांची महत्त्वाची भूमिका आहे. गुगलचे ‘एआय’ तंत्रज्ञान विकसित करण्याच्या प्रकल्पासाठी त्यांनी एक दशकभर काम केले आहे.

गुगल आणि ओपन एआयने (लोकप्रिय एआयचा चॅटबोट चॅटजीपीटीचा स्टार्टअप) २०२२ मध्ये पूर्वीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात डेटा वापरून प्रणाली तयार करण्यास सुरुवात केली होता. हिंटन म्हणाले, ‘‘ज्या प्रचंड प्रमाणात डेटाचे विश्‍लेषण केले जात होते, ते पाहून या प्रणाली मानवी बुद्धीवर मात करणार याबाबत मला खात्री होती. पण हे तंत्रज्ञान आणि त्याच्या विकासातील स्वतःच्या भूमिकेबद्दल त्यांना चिंता वाटत होती.

‘न्यूयॉर्क टाइम्सही बोलताना ते म्हणाले, की या क्षेत्रात झालेल्या प्रगतीने समाज आणि मानवतेसाठी गंभीर धोके निर्माण झाले आहेत. पाच वर्षांपूर्वीचे ‘एआय’ तंत्रज्ञान आणि आताचे तंत्रज्ञान पाहा. फरक लक्षात घ्या आणि त्याचा पुढील विचार करा. ते भीतीदायक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Latest Maharashtra News Updates : तुम्ही मला निवडलं, अजित पवारांना निवडलं आता युगेंद्र पवारला निवडून द्या - शरद पवार

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

SCROLL FOR NEXT